ओलींचे हात दाखवून अवलक्षण, चीनने बळकावली नेपाळची जमीन

भारताला विरोध करुन नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताविरुद्ध भूमिका घेऊन चीनच्या कच्छपि लागलेल्या ओला यांच्या नाकाखाली चीनने नेपाळी जमीन बळकावली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताला विरोध करणे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताविरुद्ध भूमिका घेऊन चीनच्या कच्छपि लागलेल्या ओला यांच्या नाकाखाली चीनने नेपाळी जमीन बळकावली आहे.

नेपाळने भारताशी सीमेवरून वाद ओढवून घेतला आहे. त्यामुळे नेपाळचा जवळचा मित्र आणि पालकत्वाच्या भूमिकेत मदत करणारा भारत दूर गेला आहे.

चीनच्या जवळ जाण्याचा नेपाळने प्रयत्न केला. परंतु, साम्राज्यवादी भूमिका असलेल्या चीनने नेपाळच्या भूमीवरच डल्ला मारला आहे. चीनने ३३ हेक्टरपेक्षा जास्त जमीन बळकावली असल्याचा आरोप नेपाळच्या कृषी मंत्रालयाने एका सरकारी भू सर्वेक्षणानंतर केला आहे.

पंतप्रधान ओली चीनला खूष करण्याच्या प्रयत्नात असतानाच ही माहिती सरकारी कागदपत्रांमधील अधिकृत नोंदीतून उघड झाली आहे. यानंतर पंतप्रधान ओली यांना असलेला विरोध वाढू लागला आहे.

ओली यांनी काही दिवसांपूर्वी नेपाळच्या संसदेत एक नकाशा मंजूर करुन घेतला. या नकाशात भारताच्या भूभागावर पंतप्रधान ओली यांनी दावा केला. मात्र हा दावा करण्यासाठी नेपाळ सरकारकडे एकही ठोस पुरावा नसल्याचे उघड झाले. यानंतर चीनने नेपाळचा भूभाग बळकावल्याचे उघड झाले. ओली यांना हा प्रकार यांना राजकीयदृष्ट्या भोवण्याची चिन्ह दिसत आहेत.

नेपाळमधील संकटांवर मात करायची सोडून चीनची मर्जी राखण्याला ओली यांनी महत्त्व दिले होते.  नेपाळमधील समस्या हाताळता येत नसतील तर राजीनामा द्या, अशी भूमिका माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड  यांनी घेतली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*