एकीकडे चीनची भारतावर आगपाखड; दुसरीकडे चुचकारणेही सुरू

  • चिनी परराष्ट्रमंत्री म्हणाले, “ड्रँगन – हत्ती एकत्र नाचले तर १ + १ = ११”
  • भारत – चीन सीमारेषाच ठरली नाही म्हणून होताहेत वाद

वृत्तसंस्था

पँरीस : “भारताशी संबंधांबाबत एका पेक्षा अधिक तोंडांनी बोलायचे. हाताने वेगळेच करायचे” हे चीनचे धोरण पँरीसमध्येही दिसले. भारत आणि चीनने आपल्यामधील मतभेदांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्याचे वादात रुपांत होऊ देता कामा नये असे चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी एकीकडे म्हटले तर दुसऱ्याच विधानात त्यांनी भारतालाच घुसखोर ठरवून आगपाखड केली.

पॅरिसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना वँग यी यांनी हे परस्पर विरोधी मते व्यक्त केली. चीन चर्चेच्या माध्यमातून भारताशी वाद मिटवण्यास इच्छुक असल्याचं सांगताना वँग यी यांनी सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावासाठी भारतालाच जबाबदार ठरवले.

दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या समस्या द्विपक्षीय संबंधांदरम्यान योग्य ठिकाणी ठेवल्या गेल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. वँग यी पाच देशांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. फ्रान्स आणि जर्मनीलाही यावेळी त्यांनी भेट दिली असून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चीन-भारत संबंधांवरही भाष्य केलं.

ते म्हणाले, “चीन-भारत संबंधांनी गेल्या काही काळात सर्वांचं लक्ष वेधले आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की, नियंत्रण रेषा परिसरात स्थिरता राखण्यासाठी चीन नेहमीच कटिबद्ध आहे. परिस्थिती अजून बिघडेल असं कोणतंही पाऊल चीन उचलणार नाही. आम्ही आमच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचेही रक्षण केलं पाहिजे”.

वँग म्हणाले, “चीन आणि भारत यांच्यातील सीमा निश्चित केली गेली नाही, त्यामुळे नेहमीच या प्रकारच्या समस्या येतील. भारतासोबत चर्चा करुन समस्यांवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचवेळी द्विपक्षीय संबंधांचा प्रश्न येतो तेव्हा या समस्या योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत.”

वँग यी यांनी यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकींचा उल्लेख केला. ते म्हणाले, “उदाहरणार्थ ड्रॅगन आणि हत्ती भांडण्यापेक्षा ते एकत्र नाचले तर…१ + १ = २ नसून ११ आहेत. अजून एक उदाहरण म्हणजे दोन्ही देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले अाहे. ही बाजू वादापेक्षा मोठी आहे. सामान्य हितसंबंध विरोधाभासांपेक्षा जास्त असतात. मतभिन्नतेवर नियंत्रण असले पाहिजे, त्यांचे रूपांतर वादात होऊ देता कामा नये.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*