एकनाथ शिंदेंच्या “जखमे”वर प्रवीण दरेकरांची फुंकर…!!


  •  “अजोय मेहतांच्या खांद्यावर बंदूक ठेवत मातोश्रीवरून एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न”
  •  आयुक्तांच्या बदल्यांमध्ये गौडबंगाल : दरेकर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजोय मेहता यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंख छापण्याचा प्रकार तर मातोश्रीवरून सुरू नाही ना?, अशी शंका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. ठाण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आयुक्तांच्या बदल्यांमध्ये काहीतरी गौडबंगाल आहे, अशी शंका असल्याचे प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलून दाखविले. आयुक्तांच्या बदलीचा खेळ थांबवा अन्यथा प्रशासकीय व्यवस्थापन चांगले होणार नाही, अशी सूचनाही त्यांनी ठाकरे – पवार सरकारला केली.

दरेकर म्हणाले, “आयुक्तांच्या बदल्यात गौडबंगाल आहे अशी शंका आहे. कारण जिल्ह्यात झालेल्या आयुक्तांच्या बदल्यांविषयी एकनाथ शिंदे यांना माहिती नव्हती. त्यामुळे बुधवारपर्यंत राज्याच्या मुख्य सचिवपदी असणाऱ्या अजोय मेहता यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन एकनाथ शिंदे यांचे पंख छापण्याचा प्रयत्न सुरू नाही ना? अशी शंका येते.”

“आयुक्तांच्या बदलीचा खेळ थांबवा अन्यथा प्रशासकीय व्यवस्थापन चांगले होणार नाही. सध्याच्या आयुक्तांशी चांगली चर्चा झाली. मात्र, त्यांच्या कामाच्या अंमलबजावणीपूर्वीच बदली होऊ नये,” असा टोला दरेकर यांनी लगावला. एक हजार बेडचे कोविड केंद्र बांधतात, मात्र त्यासाठी डॉक्टर, नर्स नाहीत अशी स्थिती आहे. जिल्हा रुग्णालयात व्हेटिलेटर कमतरता आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.

राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून, १ जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती