उध्दव ठाकरे तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागणार, निलेश राणे यांची टीका

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे. दरम्यान या सुनावणीदम्यान महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरुवात झाली आहे. दरम्यान या सुनावणीदम्यान महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयात झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे…तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

निलेश राणे यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, ‘उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल. कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाशी आदित्य यांचा संबंध असल्याचा दावा केला जात आहे. रिया चक्रवर्ती हिच्या मोबाईलवरून एयू नावाने असलेल्या क्रमांकावर फोन केले गेल्याचेही म्हटले आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचे मित्र असलेले चित्रपट निर्माते करण जोहर यांची चौकशी करण्यात आलेली नाही.

त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप केल्याची टीका होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीसांकडून काढून घेऊन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणीही होत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*