आशिष शेलार-शरद पवार भेट; सुप्रिया सुळेंकडून फोटोचे ट्विट

  • मोठी राजकीय घडामोड की राष्ट्रवादीने सोडलेली पुडी?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपचे नेते तिघाडी सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी अजिबात सोडत नाही. अशातच शरद पवार यांची भाजपच्या मुंबईतील एका मोठ्या नेत्याने भेट घेतली. या भेटीदरम्यान आशिष शेलार आणि सुप्रिया सुळेंचीही भेट झाली. या भेटीने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण ही मोठी राजकीय घडामोड आहे की मोठ्या घडामोडीचा आव आणून राष्ट्रवादीने सोडलेली “राजकीय पुडी” आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शेलार यांनी आज मुंबईत पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी देखील चर्चा झाली. याबाबतचा एक फोटो स्वतः सुळे यांनी टिव्टरवरून शेअर केला आहे.

गेल्या काळात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावत इनकमिंग झाले आहे, या पार्श्वभूमीवर भाजपत गेलेले नेते घरवापसी करणार,अशा राजकीय पुड्या नवाब मलिक यांनी सोडल्या. त्यामुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाल्याचा “मोठा दावा”ही राष्ट्रवादीने केला. तर दुसरीकडे भाजप आमदारांच्या पडद्यामागे काही
भेटीगाठीही घडत आहेत, असेही बोलले जात आहे.

मलिक यांची “राजकीय पुडी”

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अशीच राजकीय पुडी सोडून दिली होती. नवाब मलिक आपल्या टिव्टमध्ये म्हणाले, होते की, काही लोक राष्ट्रवादी कॉगेस पक्षाचे १२ आमदार भाजपात जाण्याची अफवा पसरत आहे, हे वृत्त खोट आहे, उलट निवडणुकीआधी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात येण्यास उत्सुक आहेत. पण यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण आशिष शेलारांच्या या भेटीने चर्चा चांगलीच रंगात आली आहे हे नक्की

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*