आयपीएलवर प्रेक्षकांचा बहिष्कार टाळण्यासाठी चीनी विवो कंपनी आऊट


  • विवोचा करार वर्षभरासाठी स्थगित; बीसीसीआयची घोषणा; मात्र 2021 ते 2023 दरम्यान नवीन करार होऊ शकतो
  • आयपीएलची टायटल स्पॉन्सर विवोकडून बीसीसीआयला वार्षिक 440 कोटी रुपये मिळतात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनी मोबाइल कंपनी विवो या वर्षी आयपीएलची टाइटल स्पॉन्सर नसेल. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने गुरुवारी कंपनीचा करार स्थगित केला आहे. विवोने 2018 मध्ये 2190 कोटी रुपयांत 5 वर्षांसाठी आयपीएलची टाइटल स्पॉन्सरशिप डील मिळवली होती. हा करार 2022 मध्ये संपणार होता. या कराराअंतर्गत व्हिव्हो बीसीसीआयला दरवर्षी 440 कोटी रुपये देत असे.

‘गव्हर्निंग काऊन्सीलच्या बैठकीनंतर आम्ही आणि विवोच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या चर्चेअंती एका वर्षासाठी कंपनी स्पॉन्सर नसणार, हे ठरले. दोन्ही बाजूंनी सामोपचाराने यावर निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या मोबदल्यात व्हिविहो कंपनीसोबतचा करार 2023 पर्यंत वाढवता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करणार आहे,’ असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

व्हिव्हो आणि बीसीसीआयमध्ये नवीन करार होऊ शकतो

आता बीसीसीआय यावर्षी नवीन टायटल स्पॉन्सरसाठी टेंडर जारी करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल आणि व्हिव्होमध्ये पुढील वर्षी 2021 ते 2023 पर्यंत नवीन करार होऊ शकतो.

आरएसएससह अनेक संघटना विवोच्या विरोधात

यावर्षी आयपीएल यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. टुर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रीय स्वंयसेवक संघासह अनेक संघटनांनी आयपीलला बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सह-संयोजक अश्विनी महाजन म्हणाल्या होत्या की, ‘‘जेव्हापासून गलवान घाटीत आमचे 20 जवान शहीद झाले, तेव्हापासून चीन आणि चीनी कंपन्यांविरोधात देशात आंदोलने होत आहेत.

अशात आयपीएलने चीनी कंपनीला स्पॉन्सर बनवले. यातून त्यांची भावना चुकीची असल्याचे दिसते. कंपनीसोबत करार रद्द केला नाही, तर आमच्याकडे आयपीएलवर बहिष्कार करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल.”

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था