आमिरच्या चीनधार्जिण्या भूमिकेवर संघाच्या मुखपत्रातून टीका

  • इस्लामिक तुर्कीत चित्रिकरण करून त्याला “सदिच्छा दूत” व्हायचेय

वृत्तसंस्था

मुंबई : धर्मनिरपेक्ष भारतात “असुरक्षित” आणि इस्लामिक तुर्कीत “सुरक्षित” वाटणारा आमिर खान सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आला आहे. संघाच्या मुखपत्रातून त्याच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

इस्लामिक तुर्कीच्या राष्ट्रपतींची पत्नी एमी एर्दोगान यांची भेट घेतल्यामुळं आमिरवर निशाणा साधण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर चीनमधील सत्ताधाऱ्यांचाही आमिर लाडका असल्याचा बोचरा टोलाही त्याला लगावण्यात आला आहे. भारतविरोधी भूमिका असणाऱ्या राष्ट्रांबाबत आमिरची भूमिका अधोरेखित करत त्यावरही लेखातून थेट प्रश्न उपस्थित केले गेले.

“Dragon’s favourite Khan” नावाच्या एका लेखातून आमिरवर निशाणा साधण्यात आला. आमिरनं ‘लाल सिंग चड्ढा’, या त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण तुर्कीमध्ये केल्याबाबतही या लेखातून नाराजी व्यक्त करण्यात आली. चिनी उत्पादनांची जाहिरात करण्यावरुनही आमिरला धारेवर धरत याचा संबंध सध्या सध्या सुरु असणाऱ्या भारत- चीन तणावाशीही जोडला गेला.

तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीसोबत छायाचित्र काढून प्रसिद्धीझोतात येत त्याला “सदिच्छादूत'” व्हायचे आहे, अशा शब्दांत हिंदी भाषेतील लेखातून संघाकडून आमिरला खडे बोल सुनावण्यात आले. ”जिथं चीनमध्ये इतर कलाकारांचे चित्रपट अपयशी ठरतात तिथेच आमिरचे चित्रपट चांगले लोकप्रिय होतात. त्याच्या ‘दंगल’ या चित्रपला तिथं चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण, सलमानच्या ‘सुलतान’ या चित्रपटाला मात्र फारशी पसंती मिळाली नाही”, असं लेखात नमूद करण्यात आले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*