आपणच आपल्यातील फूट उघड करतोय, मिलींद देवरांनी राहूल गांधींना सुनावले

भारत-चीन संघर्षाच्या काळात सर्वपक्षीय एकी दाखविण्याऐवजी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. याचा फायदा चीनकडून घेतला जात आहे. यावरून कॉंग्रेसचे तरुण नेते आणि राहूल गांधींचे विश्वासू मानले जाणारे मिलींद देवराही व्यथित झाले आहेत. आपणच आपल्यातील फूट उघड करतोय, असे त्यांनी राहूल गांधींना सुनावले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारत-चीन संघर्षाच्या काळात सर्वपक्षीय एकी दाखविण्याऐवजी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. याचा फायदा चीनकडून घेतला जात आहे. यावरून कॉंग्रेसचे तरुण नेते आणि राहूल गांधींचे विश्वासू मानले जाणारे मिलींद देवराही व्यथित झाले आहेत. आपणच आपल्यातील फूट उघड करतोय, असे त्यांनी राहूल गांधींना सुनावले आहे.

कॉंग्रेसचे सगळे नेते राहूल गांधींचे अनुकरण करत सरकारवर टीका करत आहेत. सरकारला प्रश्न विचारून घेरत आहेत. मिलींद देवरा यांनी मात्र याबाबत वेगळी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, सीमेवर चीन आक्रमक झाला आहे. दुसरीकडे देशात दुर्दैवाने या मुद्द्यावरून राजकीय चिखलफेक सुरू आहे. चीनच्या अतिक्रमणाचा आपण निषेध करायला हवा आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एकजूट व्हायला हवं. पण आपण आपल्यातील फूट उघड करतोय.

मिलिंद देवरा यांनी यापूर्वीही जबाबदार नेत्याची भूमिका बजावली आहे. अमेरिकेतील हाउडी मोदी कार्यक्रम आणि कलम ३७० या सारख्या मुद्द्यांवर पक्षावेगळे मत मांडले होते.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकाला काँग्रेसने विरोध केला होता. पण राजकीय पक्षांनी आपली विचारधारा बाजूला ठेवून यावर मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. देशाची एकता आणि अखंडता, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता, काश्मिरी तरुणांना नोकरी आणि काश्मिरी पंडितांना न्यायासाठी हे उत्तमच आहे, असे सांगत देवरा यांनी कलम ३७० हटवण्याच्या बाजूने मत मांडले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*