“आधी लखनौमध्ये राहायला जा”; कार्ती चिदंबरम यांचा प्रियांकांना साळसूद सल्ला

कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वड्रा यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्याबाबत पक्ष विचार करत असतानाच खासदार कार्ती चिदंबरम यांनी आधी लखनऊला राहायला जा, असा अनाहूत सल्ला प्रियांकांना दिला आहे.


 विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वड्रा यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्याबाबत पक्ष विचार करत असतानाच खासदार कार्ती चिंदबरम यांनी आधी लखनऊला राहायला जा, असा अनाहूत सल्ला प्रियांकांना दिला आहे.

शहरी विकास मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांना नोटीस जारी करत सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले होते. त्यानंतर पक्षाने हा नवा विचार सुरू केला आहे.

शहरी विकास मंत्रालयाच्या नोटीसनंतर शिल्लक रक्कम भरुन संकेत दिले की, त्या आता लखनौमध्येच राहतील. उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस झाल्यानंतर त्यांनी हा विचार मांडला होता. पण, मुलीची बोर्डाची परीक्षा असल्याने त्यांनी हा विचार टाळला होता. प्रियांका लखनऊमध्ये राहायला जाणार का याबाबत  राहुल आणि सोनिया गांधी यांच्याकडून उत्तर मिळणे अद्याप बाकी आहे. शीला कौल यांच्या रिकाम्या घरात राहण्याचा विचार प्रियांका गांधी करत आहेत.

मात्र, प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेशातील राजकारणावर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी तीव्र टीका सुरू केली आहे. आपली व्होट बँक जाण्याची भीती त्यांना आहे. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका वड्रा यांच्याकडे देऊनही काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्याचबरोबर अमेठी मतदारसंघाची जबाबदारी असूनही आपल्या बंधूंचा पराभवही त्या टाळू शकल्या नाहीत, असा आरोप बहुजन समाज पक्षाने केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*