आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्ज चाचणी करण्याची मागणी


बॉलीवुडच्या अनेक सेलीब्रिटींशी निकटचे संबंध असलेले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्ज चाचणी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलीवुडच्या अनेक सेलीब्रिटींशी निकटचे संबंध असलेले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्ज चाचणी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना राणावत यांनी बॉलिवूडमधील अनेकांची ड्रग टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंची ड्रग्ज चाचणी करण्याची मागणी ट्विटरवरून केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, फक्त रणवीर-रणबीर यांचीच का, आदित्य ठाकरे यांनीदेखील ड्रग्ज चाचणी करावी. कारण, तेही बॉलिवूडमधील अनेकांच्या संपर्कात असतात,’ असे ट्वीट निलेश राणेंनी केले आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचा संबंध असल्याचे दिसून आल्यावर कंगनाने बॉलीवुडमधील अनेकांना त्याची सवय आहे. अनेक सेलीब्रिटी ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला होता.

कंगनानेच सर्वात प्रथम आदित्य ठाकरे यांचा सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात संबंध असल्याचा आरोप केला होता. बॉलीवुडमधील काही बडी मंडळी आदित्य ठाकरे यांची निकटवर्तीय आहे. त्यांचा मित्र असलेला प्रसिध्द निर्माता करण जोहर याला मुंबई पोलीसांनी चौकशीसाठी बोलावले नव्हते. यावरून कंगनाने टीका केली होती. आता तर आदित्य ठाकरे यांच्या ड्रग्ज चाचणीची मागणी राणे यांनी केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था