आत्मनिर्भर भारत, रेल्वेचे रुळ आता बनणार भारतातच

  • भिलाई स्टील प्लँटमधून रूळांची पहिली खेप रवाना; रूळांचा दर्जा युरोपीय रूळांच्या तोडीस तोड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा नारा दिल्यावर त्याला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पहिला रचनात्मक प्रतिसाद दिला आहे. आता रेल्वेचे गुणवत्तापूर्ण रुळ भारताच बनणार आहेत. या प्रकारचे रुळ भिलाई येथील कारखान्यात तयारही झाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा नारा दिल्यावर त्याला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पहिला रचनात्मक प्रतिसाद दिला आहे. आता रेल्वेचे गुणवत्तापूर्वक रुळ भारतातच बनणार आहेत. या प्रकारचे रुळ भिलाई येथील कारखान्यात तयारही झाले आहेत.

भारताला सध्या या रेल्वे रुळांसाठी परदेशात, विशेषत: युरोपियन बाजारपेठेवर अवलंबून रहावं लागत होते. आता स्टील अथॉरिटी आॅफ इंडिया म्हणजेच सेलने भिलाई स्टील प्लांटमध्ये रेल्वे रुळांची निर्मिती सुरू केली आहे. या प्रकारच्या रुळांची पहिली खेप ३० जून २०२० रोजी भिलाईमधून रवाना करण्यात आली.

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या दोन वर्षांपासून याचा आग्रह धरला होता. त्याप्रमाणे सुविधा भिलाई येथील कारखान्यात केल्या होत्या. आर २६० ग्रेडच्या व्हॅनेडियम अलॉयड स्पेशल ग्रेड प्राईम रेल्वेची निर्मिती भिलाईमध्येच सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत हे रेल्वे रुळ भारतात तयार होत नव्हते. या गुणवत्तापूर्ण रुळांसाठी युरोपमध्ये जावं लागत होतं. भिलाईमध्ये  तयार झालेला रोल युरोपियन मानकांपेक्षाही चांगला असल्याचा सेलचा दावा आहे.

भारतीय रेल्वे आता आपल्या गाड्या वेगाने चालवण्याचा विचार करत आहे. सोबतच मालगाड्यांमध्ये अगोदरच्या तुलनेत आता जास्त सामान नेलं जातं. त्यामुळे रेल्वेला गुणवत्तापूर्ण रुळांची गरज आहे. सेलने हीच गरज लक्षात घेत आर २६० ग्रेड विकसित केला आणि यशस्वीपणे निर्मितीही सुरू केली. भारतीय रेल्वेला सेलकडून २६० मीटर लांबीचे वेल्डेड पॅनल दिले जात आहेत.

संपूर्ण देशाची जीवनवाहिनी मानल्या जाणार्या भारतीय रेल्वेकडून सूचवण्यात आलेल्या मानकांची अट पूर्ण करण्यासाठी सेलने सर्व आवश्यक ते बदल केले. रेल्वेला आवश्यक असलेल्या रुळांची निर्मिती केली. महारत्न दर्जा असलेल्या सेलच्या भिलाई प्लांटला रेल्वेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*