आता नागरिकांना दारात मिळणार बॅंकींग सेवा,अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांना बॅंकेच्या कामासाठी बॅंकेच्या शाखेत जावे लागू नये यासाठी डोअरस्टेप बॅंकींग सेवेची महत्वाकांक्षा योजना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आखली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांकडून दिल्या जाणाऱ्या डोअरस्टेप बॅंकींग सेवेचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते झाले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नागरिकांना बॅंकेच्या कामासाठी बॅंकेच्या शाखेत जावे लागू नये यासाठी डोअरस्टेप बॅंकींग सेवेची महत्वाकांक्षी योजना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आखली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांकडून दिल्या जाणाऱ्या डोअरस्टेप बॅंकींग सेवेचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते झाले.

बॅंकींग सुधारणांचा एक भाग म्हणून, कॉल सेंटर, वेब पोर्टल किंवा मोबाइल अ‍ॅपच्या सार्वत्रिक टच पॉइंट्सद्वारे ग्राहकांना त्यांच्या दारात बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी डोअरस्टेप बँकिंग सेवेची कल्पना मांडण्यात आली.

या सेवा देशभरातील 100 केंद्रांवर निवडलेल्या सेवा पुरवठादारांद्वारे नियुक्त केलेल्या डोअरस्टेप बँकिंग एजंट्सद्वारे सादर केल्या जातील. सध्या केवळ बिगर -आर्थिक सेवा उदा. चेक / डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर, नवीन चेक बुक स्लिप घेणे, आयटी / जीएसटी चलान घेणे, चेक बुक वितरण, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, मुदत ठेव पावती देणे, पोचपावती, फॉर्म 16 प्रमाणपत्र देणे, प्री-पेड इन्स्ट्रुमेंट / गिफ्ट कार्डची डिलिव्हरी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ऑक्टोबर 2020 पासून आर्थिक सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील. या सेवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ग्राहकांना नाममात्र शुल्कात घेता येतील. या सेवेचा फायदा सर्व ग्राहकांना मिळणार आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना त्याचा चांगला फायदा होईल. ग्राहकांना सुविधा देण्यात सार्वजनिक बॅंकांनी चांगली कामगिरी केली आहे.

मार्च -2019 आणि मार्च – 2020 या कालावधीत बॅंकांच्या एकूण गुणांमध्ये स्कोअरमध्ये 37 टक्के वाढ झाली आहे. रिस्पॉन्सिबल बँकिंग’, ‘गव्हर्नन्स अँड एचआर’, ‘एमएसएमईसाठी उद्यमीमित्र म्हणून पीएसबी’ आणि ‘क्रेडिट ऑफ टेक’ या संकल्पनांमध्ये सर्वाधिक सुधारणा दिसून आली. स्मार्ट बँकिंगमुळे कर्ज घेणे सुलभ झाले आहे. डिजिटल कर्जपुरवठयासाठी 59 मिनीटात कर्ज सुविधा सुरु केली आहे. किरकोळ आणि लघू आणि मध्यम उद्योग ग्राहकांना त्यांच्या कर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी सुविधा दिली आहे. बहुतांश शाखा-आधारित सेवा आता स्थानिक भाषांमध्ये घरी आणि मोबाइलवरून उपलब्ध करून दिल्या आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*