अवाच्या सवा वीजबिलांवर राजू शेट्टी यांंना आता आली जाग

राज्यातील जनता वाढीव वीज बिलांमुळे मेटाकुटीला आली आहे. अनेक नागरिकांनी घाबरून इकडून तिकडून पैसे गोळा करून बिल भरलेही. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आता जाग आली आहे. सरकारने वीज बिल माफ केले नाही तर प्रसंगी सरकारला शॉक देऊ असा बेगडी इशारा त्यांनी दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यातील जनता वाढीव वीज बिलांमुळे मेटाकुटीला आली आहे. अनेक नागरिकांनी घाबरून इकडून तिकडून पैसे गोळा करून बिल भरलेही. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आता जाग आली आहे. सरकारने वीज बिल माफ केले नाही तर प्रसंगी सरकारला शॉक देऊ असा बेगडी इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यातील वाढीव वीज बिलांच्या मुद्यावर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षापासून ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी सरकारविरुध्द आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे घाबरून जाऊन आंदोलनाची आपली स्पेस इतर कोणी घेऊ नये म्हणून राजू शेट्टी यांनी घाईघाईत हा मुद्दा आता घेतला आहे.

लॉकडाउनच्या काळात जनतेच्या हाताला रोजगार नाही. अशात कोणत्या ग्राहकांनी किती वीज वापरली याची खातरजमा न करता वाढीव वीज बिलं पाठवण्यात आली आहेत. सरकारने ही वीज बिलं माफ केली नाहीत तर प्रसंगी शॉकही देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. कोल्हापूरमध्ये वीज बिलांबाबत त्यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलनही करण्यात आले.

बेस्ट, महावितरणसह सर्वच खासगी वीज कंपन्यांनी ग्राहकांना वीज बिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांची सरासरी वीज बिलं पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं याच्यातील तफावत जून-जुलै महिन्यांत ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे.

केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर अनेक सेलीब्रिटींनाही प्रचंड वीज बिल आले आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंह याला तर ३३ हजार ९०० रुपये वीज बिल आले. संपूर्ण मोहल्याचे वीज बिल मला दिले का अशश शब्दात त्याने आपला संताप व्यक्त केला होता. अभिनेत्री तापसी पन्नू, हुमा कुरेशी या सेलीब्रिटींनीही वाढीव वीज बिलाची तक्रार केली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*