अभिनेत्री कंगणा राणावतला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेत्री कंगणा राणावतला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. कंगणाच्या पाली हिलच्या कार्यालयावरील कारवाईला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. कंगणाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली.

मुंबई पालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळाल्याने कंगणासह इतरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.कंगणाच्या कार्यालयातील कथित अनाधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने आज सकाळी सुरु केलेली बांधकाम तोडण्याच्या कारवाईला न्यायालयाने आज अंतरिम स्थगिती दिली.

पाली हिल येथील निवासस्थानी असलेल्या कार्यालयास कंगनाने नियमबाह्य बांधकाम केले आहे,असा दावा महापालिकेच्यावतीने करण्यात आला. यावर तिला एक नोटीस ही सोमवारी बजावण्यात आली. या नोटीसला 24 तासात उत्तर देण्याचे निर्देश पालिकेने दिले होते. त्यावर कंगणाच्या वतीने उत्तर देण्यासाठी सात दिवस मागितले होते.

तसेच बांधकाम अनाधिकृत नसल्याचा दावा तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला होता. मात्र असे असतांना आज सकाळी महपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड पोलिस बंदोबस्त घेऊन बांधकाम तोडण्यास सुरवात केली. त्यानंतर भांबावलेल्या कंगणाने सिद्दीकी यांच्या मार्फेत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायाधीशांच्या दालनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली तर सिद्दीकी यांनी कारमधून घटनास्थळी असतांना हजेरी लावली.

दरम्यान सुनावणी आधीच कंगणाच्या कार्यालयावरील मनपानं आपली कारवाई तुर्तास थांबवली. कार्यालयाच्या तळमजल्यावरील अनाधिकृत बांधकामावर कारवाई केली. न्यायालयात सुनावणीपर्यत कारवाई थांबवण्यात आली. त्यानंतर कार्यालयाच्या आत कारवाई करणारे कर्मचारी घराबाहेर पडले. कंगणाच्या कार्यालयावर तब्बल दिड तास कारवाई केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*