अजित पवार यांचे काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थला फटकारल्याने अजित पवार चांगलेच दुखावले गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे बारामतीत पत्रकारांनी या संदर्भात छेडल्यानंतर, मला यावर काही बोलायचे नाही, असे त्यांनी सांगितले. काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही, असे अजित पवार यांचे झाले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थला फटकारल्याचा अजित पवार यांना चांगलाच राग आलेला दिसत आहे. त्यामुळे बारामतीत पत्रकारांनी छेडल्यावर मला यावर काही बोलायचे नाही, असे त्यांनी सांगितले. काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही, असे आजित पवार यांचे झाले आहे.

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या तपासप्रकरणी पक्षविरोधी भूमिका घेत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली. विशेष म्हणजे याबाबतचे निवेदन त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनिल देशमुख यांना दिले. त्यानंतर ते निवेदन प्रसिध्दीसही दिले. राम मंदिराच्या मुद्यावरूनही त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली.

त्यामुळे शरद पवार यांनी पार्थची जाहीर कानटोचणी केली. पार्थच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, या शरद पवार यांच्या वागण्याचा अजित पवार यांना चांगलाच राग आला आहे. केवळ त्यांनाच नव्हे तर अजित पवार यांच्या कुटुंबातील सगळ्यांनीच याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

या सगळ्या प्रकरणात अजित पवार यांची अवस्था सांगताही येत नाही, सोसतही नाही, अशी झाली आहे. पक्षातील कोणीही त्यांच्यामागे येण्यास तयार नाही. शरद पवार यांचे पक्षावर आणि सरकारवरही पूर्ण वर्चस्व आहे. त्यातच मागच्या वेळच्या चुकीचे ओझे त्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळेच बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांना पत्रकारांनी पार्थ पवारांविषयी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचंय. मी सकाळी सकाळी या अधिकाऱ्यांना इकडे आणले असल्याचे म्हणत त्यांनी या प्रकरणावर बोलणे टाळले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*