मालेगाव रेड झोन हॉटस्पॉटच्या ‘पलिकडे’; कोरोना थांबता थांबेना


कोरोनाग्रस्तांची संख्या मालेगावात एवढ्या वेगाने वाढती आहे की ते रेड झोन आणि हॉटस्पॉटच्या ‘पलिकडे’ जाऊन पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोना रोखण्याचे प्रचंड आव्हान सरकारी यंत्रणेपुढे आहे.


विशेष प्रतिनिधी

मालेगाव : शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दि.५ मे रोजी मालेगाव शहरात दिवसभरात ५६ रुग्णांची वाढ झाली आहे. यात एका २ महिन्यांच्या बालिकेचा तर राज्य राखीव दलाच्या ३ जवानांचा व नाशिक शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. प्राप्त आकडेवारी नुसार मालेगाव शहरातील एकूण रुग्ण संख्या ३८२ वर जाऊन पोहचली आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न सपशेल फोल ठरत असल्याचे चित्र सध्या मालेगाव शहरात दिसून येत आहे. वाढती रुग्ण संख्या आरोग्य विभागाची डोके दुखी वाढवणारी असून मालेगाव शहराची रुग्ण संख्या ३८२ वर जाऊन पोहचली आहे.

दि.५ मे रोजी प्राप्त अहवालानुसार दिवसभरात ५६ रुग्णांची भर पडली आहे. यात सकाळी व दुपारी प्राप्त अहवालात प्रत्येकी एका रुग्णाची वाढ झाली आहे. तर रात्री आलेल्या पहिल्या अहवालात १७ तर दुसऱ्या अहवालात ३७ असे दिवसभरात एकूण ५६ रुग्ण वाढले असून यातील एक रुग्ण फेर तपासणीत पॉझिटिव्ह आला तर ३ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील व एक नाशिक शहरातील आहे.

उर्वरित ५१ रुग्ण हे मालेगाव शहरातील असल्याने शहराची रुग्ण संख्या ३८२ तर मालेगाव ग्रामीण रुग्ण संख्या ७ वर गेली आहे. यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला तर आता पर्यंत २८ रुग्ण करोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात