अमित शहांनी फटकारल्यानंतर मजुरांवर ‘ममता’; रेल्वेला हिरवा कंदील


स्थलांतरीत मजुरांबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दाखवित असलेल्या असंवेदनशिलतेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चांगलेच फटकारले आहे. ‘प्रवासी मजुरांना घेऊन येणाऱ्या रेल्वेला पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून परवानगी नाकारण्यात येतेय. या मजुरांना आपल्या राज्यात परतू न देणं हा अन्याय आहे. यामुळे त्यांना भविष्यात त्रास होऊ शकतो’ असे अमित शहा यांनी म्हटले आहे.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्थलांतरीत मजुरांबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दाखवित असलेल्या असंवेदनशिलतेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चांगलेच फटकारले आहे. ‘प्रवासी मजुरांना राज्यात घेऊन येणाऱ्या रेल्वेला पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून परवानगी नाकारण्यात येतेय. या मजुरांना आपल्या राज्यात परतू न देणं हा अन्याय आहे. यामुळे त्यांना भविष्यात त्रास होऊ शकतो’ असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

देशातील सर्वच राज्ये इतर राज्यांत अडकलेल्या आपल्या राज्यांतील कामगारांना परत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कामगारांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अडथळे आणत असल्याचे पुढे आले आहे.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात परत नेण्यासाठी रेल्वेच्या वतीने श्रमिक स्पेशल ट्रेन चालविल्या जात आहेत. यामध्ये सर्वाधिक कामगार बिहार राज्यात परत आले आहेत. मात्र, पश्चिम बंगाल राज्यात मात्र सर्वात कमी कामगार पोहोचले आहे.
ऐवढेच नव्हे तर जे मजूर पश्चिम बंगालमध्ये पोहोचत आहेत त्यांनाही त्रास दिला जात आहे. यावरून त्यांना पाठविलेल्या खरमरीत पत्रात म्हटले आहे की, प्रवासी मजुरांच्या प्रश्वावर ममता बॅनर्जी गप्प का आहेत, असा प्रश्न शहा यांनी केला आहे.

ममतांनी मजुरांसाठी योग्य ती पावलं उचलावीत, पश्चिम बंगालमध्ये प्रवासी मजूर अधिक चिंतेत आहेत. आत्तापर्यंत २ लाखांहून अधिक मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यात आलंय. इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगालचे प्रवासी मजुरही आपल्या राज्यात जाण्यासाठी व्याकूळ आहेत. त्यांची जाण्याची व्यवस्थाही केंद्रानं केलीय. परंतु, मला दु:ख आहे की पश्चिम बंगाल सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, अशी खंत शहा यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात