बोंबा मारत बसण्यापेक्षा आयएफएससी मुंबईत आणण्यासाठी एकत्र होऊ, आशिष शेलार यांचे आवाहन


आयएफएसी केंद्र मुंबईत व्हावे म्हणून फडणवीस सरकारनेच पाठपुरावा केला आहे. बोंबा मारत बसण्यापेक्षा महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्रितपणे केंद्राकडे जाऊन हे केंद्र मुंबईतच झाले पाहिजे असे सांगू; असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी सरकारला केले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आयएफएसी केंद्र मुंबईत व्हावे म्हणून फडणवीस सरकारनेच पाठपुरावा केला आहे. बोंबा मारत बसण्यापेक्षा महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्रितपणे केंद्राकडे जाऊन हे केंद्र मुंबईतच झाले पाहिजे असे सांगू; असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी सरकारला केले आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) केंद्र सरकारने गुजरातमधील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शेलार यांनी हा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळातील असल्याचे ट्विटरवरुन म्हटलं आहे. उगाच बोंबा मारत बसण्याऐवजी आता महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्रितपणे केंद्राकडे जाऊन आयएफएससी केंद्र मुंबईत झाले पाहिजे अशी मागणी करण्याची गरज असल्याचे शेलार यांनी म्हटलं आहे.

शेलार यांनी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे भाषण पुन्हा एकदा स्पष्ट करते आहे की,आयएफएससी गांधीनगरला करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला. ते मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता. आयएफएससी मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच एकमेव प्रस्ताव पाठवला, तो आजही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.

त्यामुळे नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा चला आता महाराष्ट्राने एकत्रपणे केंद्राकडे आयएफएससी मुंबईत झाले पाहिजे म्हणून सांगू या! असे आवाहन शेलार यांनी दुसर्या ट्विटमध्ये केलं आहे. शेलार यांनी महाविकास आघाडीलाच यासंदर्भात एकत्रितपणे केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र भाजपाचाही त्याला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या संदर्भात केवळ राजकारणच करणार की काहीतरी ठोस प्रयत्न करणार याबाबत उत्सुकता आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात