इंधन कंपन्यांच्या टाक्या फुल्ल; पेट्रोल-डिझेलच्या खपात ऐतिहासिक घसरण; लॉकडाऊनचा परिणाम


विशेष  प्रतिनिधी

नवी दिल्ली : यंदाच्या मार्च महिन्यातील भारतातील क्रुड तेल प्रक्रिया गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.7 टक्कयांनी कमी झाली आहे. चिनी विषाणूच्या उद्रेकामुळे दळणवळण ठप्प असल्याचा हा परिणाम आहे. तेल शुद्धीकरण प्रकल्प त्यांच्या क्षमतेइतके चालत नसून ही सप्टेंबर 2019 नंतर पहिल्यांदाच अशी घसरण पाहण्यास मिळाली. त्यामुळे आता तेल कंपन्यांना इंधन साठवण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत.

तेल शुध्दीकरण कंपन्यांनी गेल्या महिन्यात सुमारे 21.20 दशलक्ष टन किंवा दिवसाला 5.01 दशलक्ष बॅरल (बीपीडी) तेलावर प्रक्रिया केल्याची माहिती सरकारने दिली आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2019 मध्ये प्रक्रिया केलेल्या 5.32 दशलक्ष बीपीडीपेक्षा कमी होते. मार्च महिन्यात कच्च्या उत्पादनातही 5.5 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ते 2.70 दशलक्ष टन किंवा 0.64 दशलक्ष बीपीडी होते.

बर्‍याच रिफायनरीजने प्रवासाच्या निर्बंधामुळे इंधनाची मागणी कमी केल्याने उत्पादन कमी झाले आहे. चिनी विषाणूमुळे प्रवासी आणि माल वाहतूक थांबली आहे. लॉकडाऊनमुळे रस्ते सुनसान असून कोट्यवधी वाहने जागेवर आहेत. देशात 25 मार्चपासून लॉक सुरु झालेला लॉकडाऊन येत्या 3 मेपर्यंत कायम असणार आहे. दरम्यान, अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी चिनी विषाणू नसलेल्या ठिकाणी काही औद्योगिक उपक्रम पुन्हा सुरू करण्याची विचार सुरु आहे. मात्र त्यासही अद्याप फार प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या आठवड्यात लॉकडाऊन वाहतुकीचा आणि औद्योगिक कार्याचा फटका बसल्यामुळे एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यांत भारतीय राज्य किरकोळ विक्रेत्यांनी पन्नास टक्के कमी शुद्ध इंधन विकले असल्याचे उद्योग सूत्रांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने (आयईए) आपल्या ताज्या अहवालात अंदाज व्यक्त केला आहे की, भारतातील वार्षिक इंधन खप यंदा 5.6 टक्क्यांनी म्हणजेच 4.73 दशलक्ष बॅरल प्रतीदिवस इतका खाली येईल. वास्तवात यंदाच्या मार्चमध्ये तेलाच्या खपात 2.4 टक्के वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. सन 2019-20 या आर्थिक वर्षात भारताची वार्षिक इंधन मागणी 0.2 टक्क्यांनी वाढली. गेल्या दोन दशकातील ही सर्वात कमी वाढ होती. मात्र आताच्या चिनी विषाणूविरुद्धच्या लढ्यामुळे मार्च महिन्यात ती एकदम 17.8 टक्क्यांनी कमी झाली. दरम्यान नैसर्गिक वायुच्या वापरातही घट झाली आहे. गेल्यावर्षीचे नैसर्गिक वायूचे उत्पादन 14.4 टक्क्यांनी घसरून 2.41 अब्ज घनमीटर झाले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात