शिवसेनेशिवाय भाजपचे फक्त ४० – ५० आमदार जिंकले असते तर; काँग्रेसशिवाय राष्ट्रवादीचे १० तरी आमदार जिंकले असते का?


प्रवीण दरेकरांचे शरद पवारांना तिखट उत्तर


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेशिवाय भाजपचे ४० – ५० आमदारच निवडून आले असते हा शरद पवारांचा युक्तिवाद मान्य करायचा तर; काँग्रेसशिवाय राष्ट्रवादीचे १० तरी आमदार निवडून आले असते का?, असा तिखट सवाल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखतीत पवार यांनी, शिवसेना भाजपसोबत निवडणुकीत नसती तर भाजपला ४० – ५० आमदार निवडून आणता आले नसते, असा दावा केला होता. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरेकर म्हणाले की, आम्ही असे म्हणावे का, जर मोदींची व भाजप लाट नसती तर शिवसेनेचा एकही खासदार निवडून आला नसता. तसेच काँग्रेसशी आघाडी नसती तर राष्ट्रवादीचे १० सुद्धा आमदार निवडून आले नसते. युती किंवा आघाडीमध्ये दोन्ही पक्षांची एकमेकांना मदत होत असते. तशी मदत दोन्ही पक्षांनी एकमेकांना केली. म्हणून भाजप, शिवसेनेचे आमदार वाढले. त्यामुळे पवारसाहेब बोलले त्यात काही तथ्य नाही.

संजय राऊत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली आहे. त्यात पवारांनी उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत असल्याचे म्हटले. तसेच भाजपच्या हातात सत्ता देणे शिवसेनेच्या हिताचे नाही असेही पवार म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था