विवेक अग्निहोत्री, स्मृती इराणी यांचे लिबरल मीडियाला टोले


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लिबरल मीडियाला टोले हाणले आहेत. लिबरल मीडियातील पत्रकारांनी अर्णबच्या अटकेचा निषेध केला नाही. त्यांनी गप्प राहणे पसंत केले. यावरून या दोघांनी लिबरल मीडियाला सुनावले आहे.(arnab goswami latest news)

“पहिल्यांदी त्यांनी मला गप्प करण्यासाठी पोलीस माझ्या घरी पाठवले. नंतर कंगना राणावतचे घर तोडले. त्यावेळी “तुम्हाला” वाटले फारसे काही घडले नाही. पण ते आता अटक करण्यपर्यंत येऊन ठेपले आहेत. तुमचे “समाधान” झाले का?, असा खोचक प्रश्न विवेक अग्निहोत्रीने लिबरल मिडीयाच्या पत्रकारांना विचारला आहे.arnab goswami latest news

स्मृती इराणी यांनी देखील अशाच आशयाचे ट्विट केले होते. त्यावर निखिल वागळे यांनी अर्णबच्या अटकेशी अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा संबंध नसल्याचा दावा केला होता. त्यावर स्मृती इराणी यांनी, “सर पत्रकारितेविषयी मी तुमच्याशी बोलत नाहीये. त्याच्याशी तुमचा संबंध नाही.” असा टोला लगावला. हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.

arnab goswami latest news

आज अर्णबच्या अटकेवर जे गप्पा आहेत. त्यांची शांतता पत्रकारितेसाठी धोकादायक आहे. आज अर्णबचा नंबर लागलाय. उद्या कोणाचाही नंबर लागू शकतो, असा इशाराच स्मृती इराणी लिबरल मीडियातील पत्रकारांना दिला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था