विकास दुबेचा असा झाला Encounter; अपघाताचा फायदा घेत पहाटे ६.१८ ला पळाला, ६.४० ला ठार


वृत्तसंस्था

कानपूर : कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात ज्याचा आठवड्यापासून शोध सुरु होता, त्या कुख्यात गुंड विकास दुबे याचा अटकेनंतर २४ तासांत खात्मा झाला. अपघाताचे निमित्त करून पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्यापासून साधारण २२ मिनिटापर्यंत विकास दुबेच्या encounter चा थरार चालला. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते.

उज्जैनहून विकास दुबेला घेऊन उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची टीम (एसटीएफ) कानपूरला निघाली होती. यावेळी एसटीएफच्या ताफ्यात स्कॉर्पिओ, सफारी आणि महिंद्र अशी तीन वाहने होती. यापैकी पहाटे सव्वासहाच्या वाजताच्या सुमारास महिंद्र Tuv भौती भागात रस्त्यावर उलटली. यामध्ये एसटीएफचा एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.

अपघाताचा गैरफायदा घेऊन ६.१८ वाजता विकास दुबेने पोलिसांच्या बंदुकीसह पळ काढल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले, मात्र दुबेने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. साधारण १० ते १५ मिनिटे चाललेल्या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागल्या. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात मोस्ट वॉन्टेड गँगस्टर विकास दुबे याला काल उज्जैन येथून अटक करण्यात आली.

उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याची पत्नी आणि मुलालाही लखनौहून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आतापर्यंत विकास दुबे टोळीशी संबंधित पाच गुन्हेगारांना ठार मारले आहे. यूपी पोलिस विकास दुबेचा शोध हरियाणा आणि राजस्थानमध्ये घेत होते, पण तो मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये सापडला.

अटक ते खात्मा घटनाक्रम

गुरुवार ९ जुलै सकाळी साडेसात वाजता विकास दुबे उज्जैनमधील महाकाल मंदिरात पोहोचला. त्याने मंदिरात दर्शन घेतले. एका दुकानदाराने विकास दुबे याला ओळखले, त्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांना कळवण्यात आले. यानंतर स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले.

सकाळी आठ वाजता जेव्हा पोलीस मंदिराबाहेर आले, तेव्हा त्यांनी विकास दुबेकडे चौकशी केली, त्याचे ओळखपत्र मागितले. पण तो देऊ शकला नाही. विकास दुबेने पोलिसांशी हुज्जत घातली.

सकाळी साडेआठ वाजता पोलिसांनी विकास दुबेला पकडले. तेव्हा तो जोरात ओरडत होता की मी विकास दुबे आहे, कानपूरवाला.

संध्याकाळी सात वाजता विकास दुबेला मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशला आणण्याची कायदेशीर प्रक्रिया गुरुवारी संध्याकाळी सुरु. यूपी एसटीएफची टीम त्याला घेऊन कानपूरला रवाना.

शुक्रवार १० जुलै पहाटे सव्वा सहा वाजता – एसटीएफच्या ताफ्यातील महिंद्र Tuv पहाटे सव्वासहा वाजताच्या सुमारास भौती भागात रस्त्यावर उलटली. अपघाताचा गैरफायदा घेऊन विकास दुबेने पोलिसांच्या बंदुकीसह पळ काढल्याचा पोलिसांचा दावा पोलिसांचे दुबेला शरण येण्याचे आवाहन केले मात्र दुबेने पोलिसांवर गोळीबार केला.

पहाटे ६.२० वाजता दुबे आणि पोलिसांमध्ये चाललेल्या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागल्या. ६.४० वाजता विकास दुबेचा मृत्यू झाला.

विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात जवळपास ६० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच एका हत्या प्रकरणात विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस कानपूरमध्ये गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या पथकावर त्याच्या गुंडांकडून बेछुट गोळीबार करण्यात आला. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिस शहीद झाले, तर सात पोलीस जखमी झाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था