ठाकरे – पवारांनी लादलेली “श्रद्धा आणि सबुरी” काँग्रेस आणखी किती दिवस सहन करणार?


काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांचे “श्रद्धा आणि सबुरी” ट्विट अख्ख्या काँग्रेसचीच व्यथा बोलून दाखविणारे शिवसेना – राष्ट्रवादीच्या साट्यालोट्यात काँग्रेसच्या हाती धत्तुरा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांवर दावे करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरते राजकारण खेळून घेणार. राज्यपाल यादी मंजूर करायची वाट पाहात असल्याचे दाखवत काँग्रेसची फरफट करणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या अशा राजकीय खेळ्या काँग्रेसचे नेते आणखी किती काळ सहन करत राहणार हा खरा प्रश्न आहे. thackeray pawar sarkar news

ही चर्चा राजकीय वर्तुळात ट्रेंड होण्याचे कारण युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या ट्विटवरून सुरू झाली आहे. तांबे यांनी विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने श्रद्धा आणि सबुरी अशा दोन शब्दांचे ट्विट केले आहे. पण या ट्विटमधून त्यांची स्वतःचीच नाही, तर महाराष्ट्रातल्या अख्ख्या काँग्रेस पक्षाचीच व्यथा त्यांनी ट्विटून अर्थात बोलून दाखविली आहे.

लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या यशवंत भिंगे यांना शरद पवार विधान परिषदेची संधी देऊन काँग्रेसला खिजवणार. काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला पळवून शिवसेना त्यांना विधान परिषदेची संधी देणार. काँग्रेसच्या उमेदवारांच्या निवडीतही शरद पवार आपल्या जुगाडू पद्धतीने “हस्तक्षेप” करत राहणार आणि वर्षानुवर्षे काँग्रेसचे निष्ठेने काम करत राहणारे याही वेळेला उमेदवारी मिळाली नाही हात चोळत ट्विट करत राहणार, अशी स्थिती येऊन ठेपली आहे. सत्यजित तांबे यांच्या दोन शब्दांमधल्या ट्विटमधून ही काँग्रेसची व्यथाच त्यांनी बोलून दाखविली आहे.

विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आल्यावर महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केलेलं ट्विट चर्चेत ट्रेंड झाले आहे. सत्यजित तांबे यांनी ‘श्रद्धा और सबुरी’ असे सूचक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे. सत्यजीत यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे पाटील यांच्या जागेवरून वाद सुरु असतानाही असेच ट्विट केले होते.

मूळ पक्षातून बाहेर पडा, दुसऱ्याची उमेदवारी मिळवा

राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे

शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी

काँग्रेस – सचिन सावंत, मुझ्झफर हुसेन, रजनी पाटील आणि गायक अनिरुद्ध वनकर

राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने १२ नावांची शिफारस राज्यपालांना सादर करण्यात आली. राज्यपाल या नावांची आता छाननी करतील. घटनेच्या १७१ (५) कलमानुसार, साहित्य, कला, विज्ञान, सहकार चळवळ आणि समाजसेवा या पाच क्षेत्रांतील तज्ज्ञांची नियुक्ती करता येते. घटनेतील तरतुदीनुसार ही सारे नावे आहेत का, याचा आढावा राज्यपालांकडून घेतला जाईल. घटनेतील तरतुदीनुसार ही नावे नसतील तर राज्यपाल नावे फेटाळू शकतात.

thackeray pawar sarkar news

महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांनी मान्य केली नव्हती. तेव्हापासून उभयतांमध्ये कुरघोडी करण्याची संधी सोडली जात नाही.

मंदिरे उघडण्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात निधर्मवादाचा मुद्दा मांडला होता. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी खरमरीत शब्दांत उत्तर दिले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांना अनेकदा लक्ष्य केले. राजभवनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात जनराज्यपाल असा उल्लेख करण्यात आला असता घटनेत असे पदच नाही याकडे पवारांनी लक्ष वेधले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सहजासहजी सारी नावे मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती