कोरोना संकटात टाटांच्या ‘टीसीएस’मध्ये ४० हजार तरुणांना मिळणार रोजगार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ब-याच कंपन्यांनी कर्मचा-यांना नारळ दिला आहे, तर काही कंपन्यांनी कर्मचा-यांच्या पगारात मोठी कपात केली आहे. अशा संकटाच्या काळातही काही कंपन्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने कोरोनाच्या संकटात कर्मचा-यांना दिलासा दिला आहे. टीसीएसने देशभरातील कॅम्पसमधील ४० हजार फ्रेशर्सना नोक-या देण्याची घोषणा केली आहे.

गेल्या वर्षीही कंपनीने मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सना नोक-या दिल्या होत्या. कोरोनाच्या संकटात टीसीएसने भरती काढल्याने ती महत्त्वाची आहे. आर्थिक संकटाचा सामना करणा-या ब-याच कंपन्या एक तर कर्मचा-यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत, तर काही कंपन्या कर्मचा-यांच्या पगारात कपात करत आहे, पण टीसीएसने यापैकी काहीही केलेले नसून उलट ती नव्या भरती करत आहे.

Picture of a sign with the logo of Tata Consultancy services on their headquarters for Canada in Toronto, Ontario. Tata Consultancy Services is an Indian multinational information technology service and consulting company, subsidiary of Tata Group. TCS is the second largest Indian company by market capitalization.

एवढेच नव्हे, तर टीसीएसने अमेरिकेतील कॅम्पस प्लॅटमेंट्स यंदा दुप्पट नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी नुकतेच सांगितले की, मागणीतील सकारात्मक वातावरण लक्षात घेता कंपनी हळुहळू रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरवात करीत आहोत.

कोरोनाच्या अनिश्चिततेमुळे ते थांबविण्यात आले होते, परंतु आम्ही आमच्या सर्व योजनांचे पालन करण्यास कटिबद्ध आहोत. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकड्यांनुसार टीसीएसचा नफा एप्रिल ते जून या तिमाहीत १३ टक्क्यांनी घसरून अवघ्या ७,०४९ कोटी रुपयांवर आला आहे. हे कोरोनाच्या संकटामुळे झालेले नुकसान आहे. ते भरून काढण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती