आग्नेय आशियातील देशांनीही चीनवर डोळे वटारले; भारताच्या कणखर भूमिकेतून मिळाली शक्ती

  • युद्धसराव थांबवा, अन्यथा…; फिलिपिन्सचा चीनला इशारा
  • १ जुलैपासून चीनने पेरासेल बेटांनजीक केला युद्धसराव सुरू

वृत्तसंस्था

मनिला : चीनी आक्रस्ताळेपणा विरोधात भारताने घेतलेल्या कणखर भूमिकेतून आग्नेय आशियातील देशांनाही बळ मिळाले असून त्यांनीही चीनवर डोळे वटारायला सुरवात केली आहे. कथित south China sea मध्ये सुरू असलेला युद्ध सराव चीनने थांबवावा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा फिलिपीन्सने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धभूमीवरून चीनच्या विस्तारवादाला आव्हान दिले त्यानंतर अनेक देश चीन विरोधात आवाज बुलंद करायला लागले आहेत. फिलिपिन्सनेदेखील चीनला इशारा देत दक्षिण चीन महासागरातील युद्ध सराव थांबवण्यास सांगितलं आहे. चीनने युद्ध सराव थांबवला नाही तर त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

“दक्षिण चीन महासागरात चीनने युद्ध सराव न थांबवल्यास त्यांना गंभीर परिणांमांना सामोरं जावं लागेल,” अशी प्रतिक्रिया फिलिपिन्सचे परराष्ट्र सचिव तियोदोरो लोक्सिन ज्युनियर यांनी दिली. “चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) १ जुलैपासून पेरासेल बेटांनजीक युद्ध सराव करत आहे. या युद्ध सरावामुळे अन्य देशांच्या सर्व जहाजांना या क्षेत्रात नेव्हिगेट करण्यापासून रोखण्यात येत आहे,” असा आरोपही त्यांनी केला. असोसिएटेड प्रेसने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

पीएलए ज्या ठिकाणी युद्ध सराव करत आहे त्या ठिकाणी पेरासेलवरून जाणारे पाणीही बंद करण्यात आलं आहे. हे पाणी व्हिएतनाममधील औषध कंपन्यांसाठी देण्यात येते. चीनने फिलिपिन्सच्या क्षेत्रावर कब्जा करू नये, असे सांगून म्हणत तियोदोरो लोक्सिन ज्युनियर यांनी चिंताही व्यक्त केली. “जर चीनने हा युद्ध सराव सुरू ठेवला तर त्यांना याचा गंभीर परिणाम मग तो कोणत्याही स्तरावरील असो तो भोगावा लागेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी चीनी तटरक्षक जहाजामुळे व्हिएतनामच्या मच्छीमारांची एक बोट बुडाली होती. त्यामध्ये आठ मच्छीमारांचा समावेश होता. त्यानंतर व्हिएतनामने चीनचा निषेध केला होता. त्यावेळी देखील फिलिपिन्सने व्हिएतनामची बाजू घेतली होती. तसंच समुद्रातील मोठ्या भागात नव्या प्रदेशांतच्या केलेल्या घोषणेचाही विरोध केला होता. एकीकडे करोना व्हायरसचे संकट असताना चीनकडून अशा कारवाया केल्या जात असल्यानेही त्यांना विरोध करण्यात आला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*