रिपब्लिकनच्या चौकशीच्या नावाखाली मुंबई पोलीसांचे वर्तन चुकीचे, प्रकाश जावडेकर यांची टीका


राजकारणासाठी पत्रकारांचे दमन करणे अत्यंत चुकीचे आहे. रिपब्लिकन चॅनलबाबत टीआरपी स्कॅमच्या चौकशीच्या नावाखाली मुंबई पोलीसांकडून जे केले जात आहे ते अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. republic tv arnab goswami


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजकारणासाठी पत्रकारांचे दमन करणे अत्यंत चुकीचे आहे. रिपब्लिकन चॅनलबाबत टीआरपी स्कॅमच्या चौकशीच्या नावाखाली मुंबई पोलीसांकडून जे केले जात आहे ते अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह असल्याची टीका माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.republic tv arnab goswami

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत जावडेकर म्हणाले की, टीआरपी स्कॅम हा चुकीचाच आहेत. मात्र, हे घडले असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. तक्रारीत एकाचे नाव असते आणि गुन्हा दुसऱ्यावर दाखल केला जातो. मुंबई पोलीस जे करत आहे ते कोणालाही आवडणार नाही आणि त्याचे समर्थनही केले जाऊ शकत नाही. एडिटर्स गिल्डपासून सर्वांनीच त्याला विरोध केला आहे. याचे कारण म्हणजे पत्रकारांचे दमन करणे चुकीचे आहे.

काही लोक स्वत:ला फॅक्ट चेकर म्हणून फेक न्यूज पसरवित आहेत का या प्रश्नावर जावडेकर म्हणाले, फॅक्ट चेक करण्यासाठीच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) आहे. फेक न्यूज रोखण्यासाठी यापुढील काळात आणखी कडक पावले उचलली जातील. त्यामुळेच अनेक चॅनलनी फेक न्यूज दाखविणे बंद केले आहे. त्यासाठी अनेक चॅनलना माफी मागावी लागली आहे. अनेक वृत्तपत्रांनीही माफी मागितली आहे. त्यामुळेच आता प्रत्येक जण तथ्य पारखूनच बातमी देतो. सोर्स असल्याशिवाय कोणीही बातमी देत नाही.

republic tv arnab goswami

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना जावडेकर म्हणाले, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची निवडणूकपूर्व आघाडी होती. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उमेदवारांना मते दिली होती. आपली निवडणूकपूर्व युती सत्तेमध्ये आली होती. १६० सदस्यांचे पूर्ण बहुमत मिळाले होते. परंतु, त्यानंतर राजकीय स्वार्थापोटी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने शिवसेनेने बंडखोरी केली. जनतेशी गद्दारी करून जनादेशाचा अपमान करण्यात आला. शिवसेनेने हा अपमान केला आहे.

शिवसेनेने ही खूप मोठी राजकीय चूक केली असल्याचे प्रकाश जावडेकर म्हणाले. त्यांनी सांगितले की, पहिली संधी मिळेल तेव्हा महाराष्ट्रातील जनता शिवसेनेला त्याची अद्दल घडवेल. त्यांना असे वाटते की ते जिंकले आहेत, पण प्रत्यक्षात ते हरले आहेत. त्यामुळे या सरकारचे कोणतेही भविष्य नाही. महाराष्ट्र सातत्याने मागे पडत आहे. कारण येथे सरकार नावाची कोणतीही गोष्टच नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था