बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नाकारवर टिच्चून राष्ट्रवादीने त्यांचे पाच नगरसेवक फोडले. पारनेरसारख्या बालेकिल्यात शिवसेनेला सुरूंग राष्ट्रवादी सुरूंग लावत असतानाही स्थानिक नेत्यांना बोलायची चोरी झाली आहे.
विशेष प्रतिनिधि
पुणे : बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नाकारवर टिच्चून राष्ट्रवादीने त्यांचे पाच नगरसेवक फोडले. पारनेरसारख्या बालेकिल्यात शिवसेनेला सुरूंग राष्ट्रवादी सुरूंग लावत असतानाही स्थानिक नेत्यांना बोलायची चोरी झाली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर नगरपंचायतीचे पाच नगरसेवक फोडले. बारामती येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांचे पारनेर नगरपंचायतीवर वर्चस्व यामुळे संपुष्ठात येणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत लंके यांनी औटी यांचा पराभव केला होता.
तेव्हापासूनच औटीच्या यांच्या ताब्यातील संस्था घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे राज्यातील मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडीला मांडी लावून बसणाºया शिवसेनेला फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेसला बोलण्याची तयारी शिवसेनेच्या कोणाही राज्यपातळीवरील नेत्यांमध्ये नाही.
आमदार विजय औटी यांना मोठा धक्का असूनही त्यांनाही बोलण्याची चोरी आहे. या घटनेबाबत शिवसेना नेते अनिल देसाई किंवा मिलींद नार्वेकरच बोलतील असे त्यांनी सांगितले. वास्तविक शिवसेनेमधून कोणी पक्षांतर केले तर त्याच्यावर कार्यकर्ते तुटून पडतात. सूर्याजी पिसाळ, गद्दार अशा शेलक्या शब्दांत त्यांच्यावर टीका होते. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसवर मात्र टीका कशी करायची असा प्रश्न आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यातील अनेक जिल्ह्यांत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर गळ टाकायला सुरूवात केली आहे. मात्र, त्यांच्याविरोधात काय भूमिका घ्यायची असा प्रश्न स्थानिक नेत्यांना पडत आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते येऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देतात. मात्र, शिवसेनेचे नेते फोनही घेत नाहीत, अशी टीकाही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.