लोक प्रश्न विचारू लागल्याचा त्रास होऊ लागला का? न्यायालयात गेलेल्या कलाकारांना विवेक अग्निहोत्रींचा सवाल

प्रेक्षक आणि चाहते आत्तापर्यंत तुम्ही काहीही दाखविले तरी पाहत होते. आता ते प्रश्न विचारू लागल्यावर तुम्हाला त्रास होऊ लागला का? त्यासाठी तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले का असा सवाल ज्येष्ठ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रेक्षक आणि चाहते आत्तापर्यंत तुम्ही काहीही दाखविले तरी पाहत होते. आता ते प्रश्न विचारू लागल्यावर तुम्हाला त्रास होऊ लागला का? त्यासाठी तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले का असा सवाल ज्येष्ठ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे.

बेजबाबदार बातम्या देणाऱ्या न्यूज चॅनेल्सच्या विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जेव्हा तुमच्या घरातील प्राणी, मेकअप आणि मुलांच्या बातम्या येत होत्या तेव्हा तुम्हाला काही समस्या नव्हती का? असा सवाल अग्निहोत्री यांंनी केला आहे. जेव्हा तुमच्या घरातील कुत्री-मांजरं, त्यांचे कपडे, मेकअप, हॉलिडेज, तुमची मुलं यांच्या पेड बातम्या जेव्हा छापल्या जात होत्या. तेव्हा तुम्हाला खुप चांगलं वाटत होतं. या बातम्या वाचणारे प्रेक्षक आणि चाहते जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारु लागले तेव्हा मात्र तुम्हाला त्रास होऊ लागला. थेट न्यायालयाचाच दरवाजा तुम्ही ठोठावला, असे ट्विट केले आहे.

दिल्लीतील कोर्टात या चार जणांविरोधात आणि दोन चॅनल्स विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेसचा समावेश आहे.

द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया आणि सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांचाही याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. बॉलिवूडमधल्या कलाकारांविरोधात डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली. हे शब्द सिनेसृष्टीसाठी अपमानजनक आहेत असंही या याचिकेत म्हटलं आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*