पाकिस्तानचा घृणास्पद डाव, चीनी व्हायरस संक्रमित फिदाईन अतिरेकी धाडले भारतात; अतिरेक्याच्या ऑडिओ क्लीपमधून झाला उलगडा

चीनी व्हायरसचे संकट संपूर्ण जगावर आले असताना आपल्या दहशतवादी कृत्यांसाठी या रोगाचा वापर करण्याचा घृणास्पद डाव पाकिस्तानने आखल्याचे उघड झाले आहे. या संदर्भातली एका अतिरेक्याची ऑडिओ क्लीपच भारताच्या सैन्यदलाने हस्तगत केली आहे. 


वृत्तसंस्था

जम्मू : चीनी व्हायरसचे संकट संपूर्ण जगावर आले असताना आपल्या दहशतवादी कृत्यांसाठी या रोगाचा वापर करण्याचा घृणास्पद डाव पाकिस्तानने आखल्याचे उघड झाले आहे. भारतीय लष्कराने हा डाव हाणून पाडला. कुलगाममध्ये लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत दोन संक्रमित अतिरेकऱ्यांना कंठस्रान घातले.

पाकिस्तानने हे कोरोना फिदाईन तयार केले असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी लष्कराचा डाव आहे की जास्तीत जास्त चीनी व्हायरस संसर्गित दहशतवादी भारतामध्ये घुसवायचे. त्यांच्याकडून दहशतवादी कारवायांबरोबरच काश्मीरमध्ये चीनी व्हायरसचाही प्रसार करण्याची चाल आहे.

याबाबत एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेला एक दहशतवादी आपल्या वडीलांसोबत बोलत आहे. त्यामध्ये तो आपल्याला चीनी व्हायरसचा संसर्ग झाल्याचे कबुल केले आहे. तो वडीलांना सांगतोय की त्याच्यासोबतचे चीनी व्हायरस संक्रमित आणखी दहशतवादी लवकरच काश्मीरमध्ये जाणार आहेत.

आपल्याजवळ  खाण्यासाठी काही नाही तसेच औषधेही नाहीत, असेही तो सांगत आहे. त्यामुळे आता काश्मीरमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, असेही हा दहशतवादी त्याच्या वडलांना सांगतो. भारतीय सैन्याने हस्तगत केलेल्या  या ऑडिओ क्लिपमधील संवाद पुढीलप्रमाणे –

दहशतवादी– अब्बू…मी शाहिद बोलतोय

पिता – खूप दिवसांनी फोन केला, सगळे ठिक आहे ना?

दहशतवादी : वेळच मिळाला नाही, आज वाटले की बोलावे

पिता : तू आणि तुझे साथीदार ठिक आहात ना?

दहशतवादी : मी बरा आहे पण माझ्या पाच-सहा साथीदारांना चिनी विषाणूची लागण झाली आहे. पाक लष्कराचं म्हणणं असं आहे, की चिनी विषाणूनं बाधित झालेल्या आमच्यासारख्यांना लवकरात लवकर काश्मीरमध्ये पाठवायला हवं.

पिता : त्यांनी तुमची व्यवस्था तर चांगली केलीय ना?

दहशतवादी : आता खुदाचाच भरवसा. येथे खाण्यासाठीही काही नाही, औषधेही नाहीत. हत्यारांशिवाय आमच्याजवळ काहीही नाही.

या दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये घुसल्यावर स्थानिकांच्या घरामध्ये आसरा घ्यावा. येथील जनतेकडून खाण्यापिण्यासाठी वस्तू मागाव्या. त्यामुळे इतरांनाही चीनी व्हायरसची लागण होऊ शकते, असा पाकिस्तानचा डाव आहे. हा घृणास्पद डाव उघड झाल्याने भारतीय लष्कर अधिक सजग झाले आहे. या सगळ्या अतिरेक्यांना लवकरात लवकर टिपण्याची रणनिती आखली आहे. काश्मीरी जनतेलाही लष्कराने आवाहन केले आहे की कोणाही अतिरेक्याला आश्रय देऊ नये.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*