नाथाभाऊंना राजकारण कळतं, चुकीचा निर्णय गेणार नाहीत, देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी

जळगाव : नाथाभाऊ आमचे जेष्ठ नेते आहेत. ते आमच्यासोबत राहावे,ही आमची स्रवांचीच इच्छा आहे. त्यांना राजकारण अधिक कळतं, त्यामुळे ते पक्षांतराचा चुकीचा निर्मय कधीही घेणार नाहीत,असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहिल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. खडसे पक्षावर नाराज असून त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरु आहे. त्यासंबंधी विचारले असता श्री.फडणवीस म्हणाले, खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत, ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत,खडसेंशी भेटीबद्दल विचारले असता ते म्हणाले,आज मी तायंना भेटलो नाही किंवा काही चर्चाही केलेली नाही, मात्र योग्य वेळी आपण त्यांच्याशी सकारात्मक चर्चा नक्कीच करू.

मंदीर सुरु करण्यात अडचण काय

कोरोनाचे गांभीर्य सर्वांनाच आहे,पण एकीकडे सर्व अनलॉक होत आहे. राज्य सरकारने मंदिरालय सुरु करून त्यांना उशिरापर्यत सुरु ठेवण्याची मान्यताही दिलीय. पण मंदिर सुरु करण्यात सरकारला काय अडचण आहे? देशात अन्य ठिकाणी मंदिरं सुरु झाली असून त्याठिकाणी कोरोनासंबंधी सर्व प्रोटोकॉल पाळून दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. मंदिर बंद असल्याने त्या ठिकाणी साहित्य विकणारे,चहा विकणारे, हॉटेल्स,स्थानिक प्रवासी वाहतूकदार अशा सर्वांचीच उपासमार होत आहे. त्यांना सरकारने मदतही केलेली नाही. त्यामुळे मंदीर तातडीनं सुरु करावी, त्यासाठी आम्ही आंदोलन छेडण्याचे फडणवीस म्हणाले.


मुख्यमंत्र्यांचे उत्तर दुर्देवी

अनलॉकमध्ये सर्व खुलं होत असतांना राज्यातील मंदीर बंद आहेत. त्यासंबंधी अनेक संघटना राज्यपालांनाही निवेदन देत असताता राज्यपाल अशा प्रकारच्या निवेदनांना स्वतःचे पत्र देऊन जनतेच्या भावना कळविल्या. त्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं. ते अत्यंत दुर्देवी आहे, अशी टिका देवेंद्र फडणवीस केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*