फ्रान्समधील इस्लामी दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या शायर मुनव्वर राणांविरोधात एफआयआर दाखल


  • फ्रान्समधील हल्ल्याबाबत केले होते वादग्रस्त वक्तव्य; मोदींवरही साधला होता निशाणा

वृत्तसंस्था

लखनऊ : फ्रान्समधील इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडाचे समर्थन करणाऱ्या प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्याविरोधात लखनऊ येथील हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. munawwar rana news

राणा यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात फ्रान्समध्ये घडलेल्या हिंसक घटनेला योग्य ठरवले होते. यावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी धार्मिक भावना भडकवण्याच्या आरोपाखाली मुनव्वर राणा यांच्या विरोधात एफआयरची नोंद केली आहे.munawwar rana news

मोहम्मद पैगंबराच्या कार्टूनवरून सुरू झालेल्या वादातून फ्रान्समध्ये रक्तपात घडला होता. काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाची हत्या करण्यात आल्यानंतर फ्रान्समधील नीस शहरात एका चर्चेमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांने तिघांचा जीव घेतला होता. व्यंगचित्र आणि त्यानंतर झालेल्या हल्ल्याचे जगभर पडसाद उमटत असताना मुनव्वर राणा यांनी हल्ल्याचे समर्थन केले होते.

मुनव्वर राणा म्हणाले होते की,”जर धर्म आईसारखाचं आहे, तर कुणी आपल्या आईचं किंवा धर्माचं वाईट व्यंगचित्र काढत असेल. शिव्या देत असेल, रागामध्ये ती व्यक्ती असं करण्यासाठी मजबूर असते. मुस्लिमांना चिडवण्यासाठी असं व्यंगचित्र काढलं गेलं. जगामध्ये हजारो वर्षांपासून ऑनर किलिंग होत आहे. अखलाख प्रकरणात काय झालं?, पण तेव्हा कुणालाही त्रास झाला नाही. कुणालाही इतका त्रास देऊन नका की, तो हत्या करण्यासाठी मजबूर होईल,” असा दावा राणा यांनी केला होता.

munawwar rana news

यावरून पोलिसांनी एफआयआर दाखल करत सांगितले की, हे विधानामुळे समाजामध्ये वैमनस्य निर्माण होऊ शकते. तसेच, यामुळे सामाजिक सलोख्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो व समाजातील शांतता भंग होण्याची देखील शक्यता आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी मुनव्वर राणा विरोधात कलम १५३(ए), २९५ (ए), २९८, ५०५ सह अन्य कलामांतर्गत खटला दाखल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये झालेल्या दहशतावादी हल्ल्याचा निषेध करत, भारत या लढाईमध्ये फ्रान्ससोबत उभा असल्याचे म्हटले होते. त्यावरही मुनव्वर राणा यांनी भाष्य केले होते. “राफेलमुळे पंतप्रधानांना असे बोलावे लागत आहे,” असा आरोपही त्यांनी केला होता.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था