धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तुकडे – तुकडे गँग देश तोडतेय; मोहन भागवत बरसले


  • “संघाची हिंदू राष्ट्र संकल्पना सर्वसमावेशक; हिंदुत्वात सत्तालालसा नाही”; शिवसेनेलाही टोला

विशेष प्रतिनिधी

नागपूर : धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तुकडे – तुकडे गँग देश तोडून पाहते आहे, अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील लिबरल्सच समाचार घेतला. धर्मनिरपेक्षतेचे नाव पुढे करून समाज तोडू नका, असे आवाहनही सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात केले आहे. mohan bhagwat rss

हिंदू राष्ट्र हा शब्द संघ जेव्हा वापरतो तेव्हा त्यात सत्तापिपासा किंबहुना त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते तर सर्वसमावेशक अर्थाने हा शब्द संघ वापरत असतो, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालकांच्या भाषणानंतर त्यांनी वापरलेल्या सत्तापिपासा आणि सत्तालालसा हिंदू राष्ट्र या संकल्पनांविषयी चर्चा सोशल मीडिया वर सुरू झाली. त्यांचा अंगुलिनिर्देश शिवसेनेकडे तर नाही ना यावर नेटकरी बोलू लागले.

राजकीय स्वार्थासाठी देश तोडण्याचे काम काही लोक राष्ट्रीय एकात्मतेविरोधात करतात. त्यांना ओळखणं खूप आवश्यक आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. एकमेकांच्या स्वार्थासाठी जे नातं जोडतात ते स्वार्थ संपला की बाजूला होतात. संघाचं नातं तसं नाही संघाचं नातं हे समरसतेचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशाच्या वैविध्यतलेला विभाजनाचं नाव दिलं जातं आहे ही बाब चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

mohan bhagwat rss

हिंदू शब्दावरून वाद निर्माण करून समाजात ते दुरावा निर्माण करतात. संघाला काही कारण नसताना बदनाम केलं जातं आहे. संघाबाबत कोणत्याही चुकीच्या गोष्टी पसरवण्याच्या आधी संघाची विचारधारा समजून घ्या असंही आवाहन मोहन भागवत यांनी केलं. आपण सगळे भारतमातेचे सुपुत्र आहोत, भारतीयांना आम्ही हिंदू म्हणतो यात गैर काय? आपलं संपूर्ण शरीर एकच आहे त्यामध्ये हात वेगळे आहेत, पाठीचा भाग आणि चेहरा हे ज्याप्रमाणे दिसण्यासाठी समान नसतात पण एकाच शरीराचा भाग असतात अगदी तसेच देशाचे स्वरुप आहे. सगळे शरीर जसं एकच आहे तसाच आपला देशही एकच आहे मात्र काही लोक त्यातला फरक दाखवण्याचा प्रयत्न करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. फुटिरतावादी लोक हे राष्ट्रीय एकात्मतेविरोधात काम करत आहेत. तुकडे – तुकडे गँग असंही त्यांना म्हटलं जातं आहे ही गँग देश तोडण्याचं काम करते आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

कोरोना काळात स्वदेशी हा शब्द चांगलाच प्रचलित झाला. स्वदेशीमधला स्व हेच आमचं हिंदुत्व आहे. स्वामी विवेकानंदांनीही स्वदेशीचा मंत्र दिला होता आम्हीही तेच म्हणतो आहोत. विनोबा भावेंनी स्वदेशी म्हणजे स्वावलंबन हा अर्थ सांगितला आहे आम्हीही ती गोष्ट मानतोच आहोत असंही मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती