मोदी डरपोक, आमचे सरकार असते तर चीनला १५ मिनिटांत हाकलले असते; राहुल गांधी यांची “मुक्ताफळे”

  • पाकला त्याच्या घरात घुसून मारलेले मोदी “डरपोक” आणि चीनी माओवादी कम्युनिस्टांची देणगी घेतलेले “शूर”
  • पणजोबांच्या कारकिर्दीतील १९६२ मधील पराभवही पणतू “विसरला”

वृत्तसंस्था 

चंडीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत. त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचे सरकार असते तर १५ मिनिटात चीनला हाकलले असते असली “मुक्तफळे” काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उधळली आहेत. हरयाणामधल्या सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेछूट तोंड सोडत असताना राहुल गांधी १९६२ मधील स्वत:च्या पणजोबांच्या कारकिर्दीतील पराभव विसरले. चिनी माओवादी कम्युनिस्टांबरोबर काँग्रेसने केलेला “करार”, चिनी कम्युनिस्टांकडून घेतलेली “भरघोस” देणगीही सोयिस्करपणे विसरून गेले. १९६२ मध्येच चीनने भारताची ४५ हजर चौरस किलोमीटार जमीन हडपली. काँग्रेस सरकारांनी सीमा संरक्षण कायम दुर्लक्षित ठेवले, यावर राहुल गांधी वक्तव्य केले नाही. उलट हे सगळे “विसरून” राहुल गांधी यांनी ही “मुक्तफळे” उधळली आहेत.

राहुल गांधी म्हणले, “संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की ज्या देशात चीनचे सैन्य आले. भारताची जमीन हडप केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत त्यांनी असे वक्तव्य केले की भारताची कोणत्याही जमिनीवर चीनने कब्जा केलेला नाही. मात्र सगळ्या देशाला माहिती आहे पंतप्रधान काय बोलले होते.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत. त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. १२०० चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली वरती स्वतःला मोदी देशभक्त म्हणवतात. चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. पण या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली. जगात भारत हा असा एकमेव देश आहे ज्यामध्ये चीनच्या सैन्याने पाऊल ठेवले आणि आपली १ हजार २०० चौरस किमी जमीन हडप केली.

जर आमचे सरकार असते तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकले असते. चीनला १०० किलोमीटर मागे ढकलले असते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची ताकद, शेतकऱ्याची ताकद, मजुराची ताकद समजत नाही”

लष्कराच्या कोणत्याही जवानांना अधिकाऱ्यांना विचारा ते सांगतील की मोदी हे आपली प्रतिमा जपण्यासाठी देशाशी खोटे बोलले. ते भारतमातेची गोष्ट करतात. त्यांनी भारतमातेचे १२०० चौरस किलोमीटर चीनला देऊन टाकले. माना किंवा नका मानू पण हे सत्य आहे. याबाबत मोदी काय बोलतात? असा सवालही त्यांनी दुपारी केला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*