मंत्री विजय वडेट्टीवार यांचा ताफा अडवलाच, संभाजीराजे यांचे शेतकऱ्यांना समर्थन मुखेडमध्ये ताफा अडवून केली ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुखेड : अतिपावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचा ताफा अडवला. यावर खासदार संभाजीराजे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना तसे करण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी सरकारच्या मदतीची अपेक्षा धरायची नाही तर कुणाकडून अपेक्षा धरायची, असा सवाल त्यांनी केला. मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी नेत्यांना काही ठिकाणी अडवले जात आहे. नांदेडमध्ये असाच प्रकार आज घडला. पाहणी दौरे बंद करा म्हणत शेतकऱ्यांनी विजय वडेट्टीवार यांचा ताफा अडवला.

मदत पुनर्वसन मंत्र्यांचा ताफा अडवत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. पाहणी दौरे बंद करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मुखेड तालुक्यातील सलगरा इथं ही घटना घडली. यावेळी मंत्र्यांना निवेदनाद्वारे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*