मराठा समाजाने EWS मधील आरक्षण घ्यावे; प्रवीण गायकवाडांची संभाजी राजेंपेक्षा वेगळी भूमिका

 • SEBC आरक्षण मिळेल असे वाटत नाही

विशेष प्रतिनिधी

पुणे : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले असताना संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा संघटनांतील मतभेद समोर आले आहेत. ‘एसईबीसी (SEBC) आरक्षण कोर्टात टिकणार नाही मात्र ईडब्लूएस (EWS) आरक्षण टिकेल. एसईबीसी आरक्षण मिळूच शकणार नाही. त्यामुळे EWS हे आर्थिक निकषावरील आरक्षण जे मिळतेय ते घ्यावे,’ अशी थेट भूमिका प्रवीण गायकवाड यांनी घेतली आहे.

प्रवीण गायकवाड यांनी ही भूमिका घेतली असली तरी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी वेगळीच भूमिका घेतली होती. ‘मराठ्यांना EWS मधील आरक्षण देऊ नका. कारण हे आरक्षण घेतल्यास सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे मिळणाऱ्या आरक्षणाबाबत कोर्टात जी लढाई सुरू आहे, तिच्यावर नकारात्मक परिणाम होईल,’ अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. या भूमिकेला आता संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी छेद दिला आहे.

प्रवीण गायकवाड म्हणतात :

 •  राज्यात ,केंद्रात ews आर्थिक मर्यादा वाढवून घ्यावी. कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण घ्यावे
 •  Sebc हे obc प्रवर्गात टिकणार नाही. शिवाय ५०% मर्यादा ओलांडली आहे. यामुळे sebc आरक्षण टिकणार नाही
 •  दोन दिवस ब्रिगेडची बैठकीत चर्चा झाली.
 •  अजून किती पिढ्या वाट बघणार? ४० वर्ष झाली. किती दिवस आरक्षण मुद्दा रेटायचा?
 •  आंदोलनात उतरायचं नाही. आरक्षण विषय संपवला पाहिजे. Ews चे स्वागत केले पाहिजे.
 •  खाजगीकरण झाल्याने नोकऱ्या नाहीत. सारथी ला ५००० कोटींची गरज आहे.
 •  सोन्याच्या ताटात जेवणच नाही मग काय उपयोग? चांदीच्या ताटात जेवण आहे ते जेवावे.
 •  काही लोकांना आपले नेतृत्व प्रस्थापित करायचे आहे. थोपवायचे आहे.
 •  obc मध्ये जर मराठा समाजाला टाकले तर सिव्हिल वॉर होईल. सामाजिक स्वास्थ्य बिघडेल.

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*