मराठा समाजासाठी जीव धोक्यात घालून फिरतोय, पण या ठाकरे–पवार सरकारला काय सांगायचे…??


  • खासदार छत्रपती संभाजी राजेंचा उद्रेक, मराठा समाजाला सरकार गृहीत धरतेय

विशेष प्रतिनिधी 

जालनामराठा समाजासाठी मी माझा जीव धोक्यात घालून फिरत आहे. सरकारला काय सांगायचं?, असा उद्रेक खासदार संभाजी राजे यांनी व्यक्त केला. आता मी बोलून थकलो आहे. सरकारनं मराठा आरक्षणाबाबत त्वरित पावलं उचलावीत एवढीच माझी विनंती आहेआता मी थकून गेलो आहे,” अशी प्रतिक्रियाही खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली. मी किती वेळा बोलायचं.maratha reservation latest news

मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालनाकोल्हापूरनवी मुंबई या ठिकाणी होतो. मी आता बोलून बोलून थकलो आहे. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहे,” असे उदगार संभाजीराजे यांनी काढले. मराठा आरक्षणाबाबत टीव्ही ९ मराठीने ही बातमी दिली आहे.

मराठा आरक्षणाबाबत अजूनही वेळ गेलेली नाहीसरकारने ताबडतोब पावलं उचलावीत. एवढीच विनंती आहे. मी थकलो आहे. थकून गेलो आहे,” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित व्हावं असं मी अनेक दिवसांपासून सांगत आहे. दोन दिवसांपूर्वी माझं अशोक चव्हाण यांच्याशीदेखील बोलणं झालं होतं. त्यावेळी मी त्यांना उपसमितीची बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. तीदेखील सध्या झालेली दिसत नाही. याचंच आपल्याला आश्चर्यही वाटत असल्याचं ते म्हणाले. 

मराठा समाजाला गृहित धरताय का?, वकील अनुपस्थित कसे राहू शकतात?

सुनावणीदरम्यान सरकारी वकील कुठे आहेत असा सवाल न्यायालयाकडून करण्यात येतो. त्यावेळी ते उपस्थित नसणं हे दुर्देवी आहे. मराठा समाजाला अशा पद्धतीनं गृहित धरायला लागले आहेत का आमचा सरकारी वकिलांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्याबद्दल कोणतंही दुमत नाही.

maratha reservation latest news

आपली बाजू मांडणं महत्त्वाचं आहे,” असंही संभाजीराजे म्हणाले. मराठा आरक्षण हा विषय गांभीर्यानं घ्यावात्यातील बारकावे समजून घ्यावे ही यापूर्वीपासून सरकारला सांगत आलो आहे. काही तांत्रिक घोळ झाल्याचं माझ्या कानावर आलं आहे. परंतु पुढील सुनावणीला कोणी उपस्थित न राहिल्यास चुकीचा संदेश जाईल. जी कोणतीही चूक झाली ती ताबडतोब दुरूस्त करण्यात यावी असंही ते म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था