मराठा क्रांती मोर्चाचा उध्दव ठाकरेंवर संताप, मातोश्रीवर मशाल मोर्चा काढून विचारणार जाब


राज्यातील महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर येत्या ७ नोव्हेंबर रोजी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. maratha kranti morcha


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली. याचा मराठा समाजामध्ये संताप आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर येत्या ७ नोव्हेंबर रोजी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. maratha kranti morcha

याबाबत माहिती देताना मराठा क्रांती मोर्चाने म्हटले की, मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे. हा रोष विविध आंदोलनांमधून, बैठकांमधून व्यक्त होत आहे. त्यातच राज्य शासनाने एमपीएससीची परीक्षा घेण्याचा अट्टाहास, नोकरभरती करण्याचा निर्णय घेतल्याने मराठा समाजाच्या असंतोषात भर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज्य शासनाने जबाबदारीने आणि अत्यंत तातडीने पावले उचलून मराठा विद्यार्थांचे, तरुणांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित होते.

स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्यासाठी घटनापीठाची निर्मिती करण्यासाठी अर्ज करणे, प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, या सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती योग्य निर्णय घेण्यात अपयशी ठरली आहे. तसेच स्वत: चव्हाण अनेकदा गोंधळलेले दिसले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे.

maratha kranti morcha

या मोर्चात मुंबईतील मराठा समाजाच्या सर्व आमदार-खासदारांना सामील होण्याचं आवाहन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती बरखास्त करुन नवीन समितीची स्थापना व्हावी, यामध्ये विरोधी पक्षाचाही समावेश व्हावा. सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाच्या निर्मितीसाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. मराठा तरुणांच्या नोकर्या, विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित केले जावेत, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाने केल्या आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था