आघाडीचे नेते बांधावर फोटो काढणार आणि शेतक-यांना मदत केंद्राने करायची?

  • निलेश राणे यांचा खोचक सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीचे मंत्री, नेते अतिवृष्टी नुकसानीचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढणार आणि मदतीसाठी केंद्राकडे हात पसरणार, अशी खोचक टीका माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे.

‘महाविकास आघाडीचे नेते शेतीच्या बांधावर जाऊन फोटो काढणार आणि शेतक-यांना केंद्र सरकार मदत करणार?’, असा खोचक सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

शरद पवार यांनी उस्मानाबाद दौ-यात पत्रकार परिषद घेऊन शेतक-यांना भरीव मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार, असे सांगितले. यावर निलेश राणे यांनी टीका केली.

‘महाराष्ट्रातील शेतक-यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटले आहे. आता असे झालेय, महाविकास आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार आणि शेतक-यांना केंद्र सरकार मदत करणार’, असा चिमटा निलेश राणे यांनी ट्विटरवर काढला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*