खडसेंची भेट झाली पण त्यात कोणी काळंबेरं काढू नये; अजितदादांचे प्रतिपादन

  • खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातमीवर पहिल्यांदा पवारांनी दिली प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी

पुणै : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याशी भेट झाली परंतु या भेटीतून कुणी काळंबेरं काढू नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. भाजपला सोडचिठ्ठी देऊन खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. खडसे जाहीरपणे आपल्यावरील अन्याययाला देवेंद्र फडणवीसांना जबाबदार ठरवत असून यामुळे ते पक्षातून बाहेर पडणार असल्याचे बोललं जात आहे. राष्ट्रवादीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळंबेरं समजू नये. खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे,” असे अजित पवार यांनी सांगितले. पुण्यात अजित पवारांच्या
हस्ते विधान भवन येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडवणीस यांनी नाथाभाऊंना राजकारण नीट समजते. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया जळगावात बोलताना दिली होती. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसेंच्या पक्षांतरासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले होते की, “खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण चांगले कळते. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे”.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*