केरळच्या कथित “कोरोना फायटर मॉडेलची” अवघ्या तीन महिन्यांत पोलखोल

  • ऍक्टिव्ह केसेसमध्ये प्रचंड वाढ; डाव्या आघाडी सरकारच्या उपाययोजना पडल्या तोकड्या

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम : कोरोना साथीच्या विरोधात प्रभावी उपचार पद्धती ठरवून केरळच्या “कोरोना फायटर मॉडेलची” अफाट स्तुती करणाऱ्या लेफ्ट लिबरलची पुरती पोलखोल झाली आहे. केरळमध्ये कोरोनाच्या ऍक्टिव्ह केसेस प्रचंड प्रमाणात वाढल्या असून देशातील पहिल्या क्रमांकाच्या राज्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे.

तेथे अनेक ठिकाणी कोरोनाची साथ उलटून आली आहे. केरळच्या डाव्या आघाडीच्या राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना तुटपुंज्या ठरल्या आहेत. तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी घराघरात जाऊन कशा तपासण्या केल्या, ऍक्टिव्ह केसेस कशा शोधून काढल्या याविषयीची रकानेच्या रकाने वर्णने डाव्या लिबरल पत्रकारांनी मोठ्या वर्तमानपत्रातून केली होती.

वृत्तवाहिन्यांवर त्याचा बोलबाला घडवला होता. सुरुवातीच्या काळात ऍक्टिव्ह केसेस कमी झाल्याचे सांगण्यात आले होते. राज्य सरकारने केलेल्या प्रभावी उपाययोजनांचा डांगोरा पिटण्यात आला होता.

परंतु आता तीनच महिन्यांत हेच राज्य सरकारचे कथित प्रभावी उपाय तोकडे पडून केरळमधील कोरोनाच्या ऍक्टिव्ह केसेस वाढून राज्याची वाटचाल देशातले कोरोना पीडित पहिले राज्य याकडे होत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*