कंजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवरील वादात संजय राऊत – सुप्रिया सुळे यांच्य भूमिकांमध्ये राजकीय अंतर


  • संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेंनी उचलून धरली मुख्यमंत्र्यांची बाजू

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतल्या मेट्रो कारशेडच्या वादाने केंद्र विरूद्ध राज्य असे वळण घेतल्यानंतर महाआघाडीतील दोन प्रमुख नेते खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकांमध्येही अंतर असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने कांजुरमार्गच्या (kanjur car shed) जागेवरून आक्षेप घेतल्याने ठाकरे – पवार राज्य सरकार कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले असताना खासदार संजय राऊत यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावध भूमिका घेतली आहे, तर सुप्रिया सुळे यांनी केंद्राच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.kanjur car shed

केंद्र सरकार मेट्रो कारशेडमध्ये खोडा घालत असल्याचा आरोप होत असताना संजय राऊत यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याची उत्सुकता होती. परंतु, राऊत म्हणाले, हा विषय राज्य सरकार हाताळत आहे. त्यामुळे यावर तेच प्रतिक्रिया व्यक्त करतील. राज्य सरकार त्यावर योग्यपद्धतीने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितलं. भाजपचे नेते आशिष यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती त्यावरील प्रश्नालाही राऊत यांनी बगल दिली. हा विषय सरकारचा आहे सरकार बोलेल असेही त्यांनी सांगितले. कायम केंद्र सरकारवर तोफ डागणाऱ्या राऊत यांनी या मुद्द्यावर सावध भूमिका घेत प्रकरण चिघळणार नाही, याची काळजी घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.kanjur car shed

मेट्रो कारशेडला कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भाजपने राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. पण, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले आहे.kanjur car shed


आरेची 800 एकर जागा जंगल घोषित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचा प्रकल्प हा कांजूरमार्ग इथं हलवला आहे. त्यानंतर कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात देखील झाली आहे. पण, आता केंद्र सरकारने कांजूरमार्गच्या जागेवर दावा केला आहे

खासदार सुप्रीया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांची बाजू उचलून धरली आहे. कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने केलेला दावा धक्कादायक आहे. ती जमीन महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे काम करतेय, अशी प्रतिक्रिया खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कृतीतून ते दिसतंय, हे दुर्दैवी आणि निंदाजनक आहे. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करत आहेत? जमीन महाराष्ट्राची आहे ती विकास कामासाठी वापरली जातेय, अशी टीका सुळे यांनी केली.kanjur car shed

मेट्रो कारशेडची मूळची आरेची जागा देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेड कंजूरमार्गच्या जागेवर हलविण्याचा निर्णय घेतला. ती जागा राज्य सरकारच्या मालकीची असल्याचा दावाही करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी हा विषय राजकीय प्रतिष्ठेचा केला असताना संजय राऊत सावध प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि सुप्रिया सुळे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांची बाजू उचलून धरतात यातील फरक स्पष्ट दिसून येतो आहे.

kanjur car shed

केंद्र सरकारचा दावा

केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीआयपीपी) मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव सचिन कुमार यांना पत्र पाठवून कारशेडच्या जागेवर आपला हक्क सांगितल्याचं समोर येत आहे. “कांजूरमार्गची जागा मिठागराची असून, त्यावरील हक्क आम्ही सोडलेला नाही. ‘एमएमआरडीए’ने यापूर्वीही या जागेवर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र तो फेटाळला होता. आता या जागेवर परस्पर कारशेड उभारली जात असून, ते चुकीचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे मोठे नुकसान होणार आहे. याबाबत तातडीने हस्तक्षेप करत एमएमआरडीने सुरु केलेलं कारशेडचं काम थांबवावं, असं या पत्रात म्हटले आहे.

काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा धक्कादायक आहे. ती जमीन महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था