कमलनाथांनी राहुल गांधीनाही टोलवले; “माफी मागणार नाही”, म्हणाले…!!

महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्यानंतरही कमलनाथांची गुर्मी कायम


वृत्तसंस्था

इंदूर : महिलांविषयी अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कलमनाथ कमलनाथ यांची गुर्मी कायम असून त्यांनी राहुल गांधी नाही टोलवून लावले आहे. राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आपल्याला त्यांची भाषा अजिबात आवडली नसल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी स्पष्टपणे खडसावल्यानंतरही कमलनाथ यांनी मात्र माफी न मागण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले, “कमलनाथ माझ्या पक्षातील आहेत, पण मला त्यांनी वापरलेली भाषा अजिबात आवडलेली नाही. ते कोण आहेत यामुळे फरक पडत नाही, पण मी अजिबात त्याचं समर्थन करणार नाही. हे दुर्दैवी आहे.”

राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कमलनाथ यांनी म्हटलं आहे की, “हे राहुल गांधींचे मत आहे. ते वक्तव्य का केले यासंबंधी स्पष्टीकरण मी दिले आहे. ते वक्तव्य करताना काय संदर्भ होता याचे स्पष्टीकरण मी दिले आहे. त्यात अजून काही सांगण्याचं कारण नाही”. कमलनाथ यांना यावेळी इमरती देवी यांची माफी मागणार का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जर माझा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता तर माफी का मागावी?

जर कोणाला अपमानित वाटत असेल तर मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे”.

ग्वाल्हेरच्या डबरा मतदारसंघात भाजपने इमरती देवी यांना उभे केले आहे. येथील काँग्रेस उमेदवार हे साधे असून, इमरती देवी यांच्यासारखे ‘आयटम’ नाहीत, असे वक्तव्य रविवारी येथे एका निवडणूक प्रचारसभेतील भाषणात कमलनाथ यांनी केले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*