चीनी व्हायरसने अमेरिकेला धडकी; पंतप्रधानांनी मात्र भारताला वाचवलं.. नड्डा यांचे प्रतिपादन


विशेष प्रतिनिधी 

पाटणा: चीनी व्हायरसच्या संकटाने अमेरिकेला धडकी भरली असताना पंतप्रधान मोदींनी मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन या संकटाच्या काळात भारताला वाचवले, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय  अध्यक्ष जे. पी. नड्डा (jp nadda news) यांनी केले.

नड्डा म्हणाले, अमेरिकेतील अध्यक्षीय पदाच्या निवडणुकीचे निकाल येत आहेत. तिथे जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाच्या प्रश्नावर घेरले. चीनी व्हायरसमुळे ट्रम्प अडखळले. पण भारतात पंतप्रधान मोदींनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन देश वाचवला.jp nadda news

चीनी व्हायरस भारतात आल्यानंतर आणि लॉकडाउन घोषित केला तेव्हा देशात तपासणीसाठी एकच लॅब होती. पण आज दिवसरात्र परिश्रम करून आपण दररोज सुमारे सव्वा दशलक्ष चाचण्या देशात करू शकतो. लॉकडाउन लागू करून सरकारने करोना संकटाशी लढण्यासाठी तयारी केली. आज देशात पीपीई किट्स आणि व्हेंटिलेटर्स पुरेशा प्रमाणात तयार केले जात आहेत.

jp nadda news

राष्ट्रीय  जनता दलावर टीका करताना नड्डा म्हणाले,आता बिहार कंदीलपासून मुक्त होऊन एलईडी युगात आला आहे. गुंडगिरीपासून विकासाच्या दिशेने जात आहे. लुटीचे राज सोडून डीबीटीकडे जात आहे. बिहारमध्ये रामजन्मभूमीबद्दल का बोलता? असा प्रश्न काही जण उपस्थित करत होते. त्यांनी सीता मातेच्या भूमीवर रामजन्मभूमीबद्दल बोललो नाही तर कुठे बोलणार.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था