ठाकरे – पवार सरकार तरूणांना नोकऱ्या लावणार की “कामाला लावणार…!!”; रोजगार नोंदणीसाठी दोन पोर्टल्सचा घोळ


  • शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांचे आगळे “कौशल्य”; राष्ट्रवादीच्या कौशल्य मंत्र्याचे वेगळे “उद्योग”

विशेष प्रतिनिधी

मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील संघर्षानंतर आता ठाकरे – पवार सरकारचा आणखी एक गोंधळ समोर आला आहे. लॉकडाऊननंतर राज्यातील उद्योगधंद्यांना मनुष्यबळ पुरवण्याच्या दृष्टीने सरकारकडून ऑनलाईन रोजगार नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, यासाठी दोन स्वतंत्र पोर्टल्सवर नोंदणी सुरू झाल्याने सरकार तरूणांना नोकऱ्या लावणार की “कामाला लावणार” याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

यापूर्वी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या महास्वयंम पोर्टलवर रोजगार नोंदणी होत असे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात रोजगार नोंदणीसाठी उद्योग विभागाकडून स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ठाकरे – पवार मंत्रिमंडळात कौशल्य विकास विभाग राष्ट्रवादीकडे तर उद्योग विभाग शिवसेनेकडे आहे. त्यामुळे आता या ठिकाणीही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कुरकुरघोडीचे राजकारण सुरू असल्याची खात्री पटत आहे.

आज उद्योग विभागाने महाजॉब पोर्टलची सुरुवात केली.जुन्या महास्वयंम पोर्टलवर बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी नोंदणी करता येत होती. कुठे नोकर्‍या उपलब्ध आहेत, याची जिल्हानिहाय माहिती या पोर्टलवर मिळू शकते. तरीही नवे पोर्टल सुरू झाल्याने आता रोजगार नोंदणीसाठी येणाऱ्या तरूणांचा गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही पोर्टल्सचे समायोजन करावे, अशी मागणी कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी करून “बैल गेला आणि झोपा केला” या म्हणीचा प्रत्यय महाराष्ट्राला आणून दिला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था