गृहमंत्र्यांच्या नागपूरात पोलिसाचे घटस्फोटित महिलेवर अत्याचार

  • अश्लील व्हिडिओ शूट करून धमकीही; पोलिसास अटक

वृत्तसंस्था 

नागपूर : घटस्फोटित महिलेस गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार करत व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत असलेल्य पोलिसास गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये अटक करण्यत आली आहे.

३३ वर्षीय घटस्फोटित महिलेचे लैंगिक शोषण केल्याची ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अत्याचार करणाऱ्या पोलिसाला अटक केली आहे. विक्रमसिंग जगतसिंग बनाफर (वय ३०, रा. नर्मदा कॉलनी, फ्रेण्ड्स कॉलनी),असे अटकेतील पोलीस शिपायाचे नाव आहे. तो पोलीस मुख्यालयात तैनात आहे.

ही महिला खासगी कंपनीत लिपिक आहे. ती घटस्फोटित असून अंबाझरी परिसरात राहाते. याच कंपनीत विक्रमसिंग हा कामाला होता. त्यामुळे तो महिलेला ओळखायचा. २०१६ मध्ये तो पोलीस दलात रूजू झाला. पोलीस झाल्यानंतर विक्रमसिंग याने महिलेसोबत ओळख वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवले.

home२०१७ मध्ये पीडित महिलेसह तो बेलतरोडीतील श्रीकृष्णा एनक्लेव्ह येथे राहणाऱ्या मित्राच्या फ्लॅटवर आला. तिथे महिलेला नाश्त्यातून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाली. विक्रमसिंग याने तिच्यावर अत्याचार केले. मोबाइलमधून अत्याचाराची चित्रफितही काढली. ही चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलेचे वारंवार शोषण करायला लागला.

सहा महिन्यांपूर्वी विक्रमसिंग याचे लग्न झाले. लग्नानंतर तो महिलेला आणखी त्रास द्यायला लागला. त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेने बेलतरोडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून विक्रमसिंग याला अटक केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*