अर्थव्यवस्था रूळावर येताना आयटी कंपन्यांकडून पगार वाढीचा विचार


  • वाजवा फटाके; अनेक आयटी कंपन्यांकडून पगारकपात मागे, वाढीचा विचार सुरू
  • काही कंपन्या कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स बोनसही देणार
  • टीसीएस इन्फोसिस रिलायन्स विप्रो माइंड ट्री एचसीएल आदी कंपन्यांचा समावेश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील राजकीय गदारोळात आणि कोरोना लॉकडाऊन मधील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या आधी चांगली बातमी आली आहे. लॉकडाउनमुळे झालेल्या नुकसानीत अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगार कपात केली होती. मात्र, आता अर्थव्यवस्था रूळावर येत असल्याने यांपैकी बहुतेक कंपन्यांनी पगार कपात मागे घेण्याचा निर्णय घेऊन काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा विचारही करीत आहेत. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचाही विचार करीत आहेत.economy

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये काही विभागांनी कर्मचाऱ्यांचे कमी केले पगार पूर्ववत केले आहेत. त्याचबरोबर कोविड लॉकडाउनच्या काळात चांगल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिलायन्सकडून परफॉर्मन्स बोनसही देण्यात येणार आहे. पीटीआयने याबाबत बातमी दिली आहे.

इंधनापासून टेलिकॉम क्षेत्रात विविध नोकऱ्या उपलब्ध करुन देणाऱ्या रिलायन्स कंपनीने पुढील वर्षाच्या पगारामध्ये ३० % अॅडव्हान्स देण्याचाही विचार करीत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी करोनाच्या काळात काम केलं अशा लाखो कर्मचाऱ्यांना सद्भावना म्हणून ही रक्कम देण्यात येणार आहे.

economy

बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, गेल्या तीन आठवडयांपासून टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि माईंडट्री यांसारख्या अनेक टॉपच्या आयटी कंपन्यांनी नवी पगारवाढ जाहीर केली आहे. तसेच सणांच्या काळात बोनसही देणार असल्याचं म्हटलं आहे. अनेक मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा कंपन्याही पगार कपात मागे घेण्याचा विचार करीत आहेत. करोना लॉकडाउनचा या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला होता. या काळात या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या तर अनेकांना मोठ्या पागार कपातीला सामोरं जावं लागलं होतं.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था