देवेंद्र फडणवीस यांचे लाव रे तो व्हिडीओ, आता मदत कोठे अडत आहे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत येण्यापूर्वी केलेल्या ५० हजार ते दीड लाखापर्यंतच्या मदतीच्या मागणीच्या बातम्या जाहीरपणे दाखवत आता मदत कुठे अडत आहे? असा सवाल करत  लाव रे तो व्हिडीओ शैलीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.


विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत येण्यापूर्वी केलेल्या ५० हजार ते दीड लाखापर्यंतच्या मदतीच्या मागणीच्या बातम्या जाहीरपणे दाखवत आता मदत कुठे अडत आहे? असा सवाल करत  लाव रे तो व्हिडीओ शैलीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी  देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आहेत.  या वेळी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे  नुकसान झाल्यानंतर खरीप पिकांसाठी केलेल्या हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी दीड ते दोन लाख रुपये देण्याची मागणी केली होती.

या बातम्या दाखवित फडणवीस म्हणाले,मी काळजीवाहू मुख्यमंत्री असतानाही केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. सध्याची परिस्थिती पाहता, मी राजकारणावर काहीही बोलणार नव्हतो. मात्र तुम्ही राजकारणावर बोलाल तर मीही त्याला उत्तर देईन.

जलयुक्त शिवारच्या कामांसंदर्भातले अधिकार स्थानिक स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. सरकारने चौकशी जरूर करावी. अशा चौकशा लावून विरोधी पक्षाचे तोंड बंद करता येत नाही, असे फडणवीस म्हणाले

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही नुसतेच भावनिक बोलू नका, मदत द्या…, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*