दसरा मेळावा शंभर लोकांत करा,अन्यथा शिवसेनेवर कारवाई

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करावे, नवरात्र सुरु झाले आहे. त्यामुळे लवकरच शिवसेना आपला दसरा मेळावा घेईल,शिवसेनेने आपला दसरा मेळावा शंभर जणांच्या उपस्थितीतच करावा. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मेळावा करावा, अन्यथा शिवसेनेवर कारवाई होईल, हे लक्षात ठेवावे,असे केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

श्री.आठवले एका कार्यक्रमासाठी आज नाशिकला आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकर परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, राष्टॅरवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यामुळे ते राज्यभर दौरा करतात. त्यांनी आपल्या दौऱ्यानंतर राज्य सरकारला माहीती द्यावी, शेतकऱ्यांसाठी काय मदत करायची गरज आहे. हे सरकारला सांगावे, नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने प्रसंगी कर्ज काढावे,मात्र शेतकऱ्यांना मदत करावी.

कंगणाच्या भूमिकेशी सहमत नाही

मध्यंतरी कंगणा रानावत यांनी केलेले टिव्ट,शिवसेना व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी ज्या भाषेचा उपयोग केला. त्याच्या विविध प्रतिक्रीया उमटल्या. त्यावरून अभिनेत्री कंगणा रानावत यांना पाठिंदा देत तिच्या निवासस्थानी जाऊन रामदास आठवले यांनी भेट घेतली होती. यासंदर्भात आज आठवले यांनी आपली भूमिका काही प्रमाणात बदलली. ते म्हणाले, कंगणा रानावतच्या भूमिकेशी मी सहमत नाही. तिच्या सर्व मताशी देखील मी सहमत नाही. यासंदर्भात तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात योग्य ती चौकशी होईल,तिच्यावर अन्याय होत आहे. या भूमिकेतून मी तिला पाठिंबा देत होतो.

लॉकडाऊनमध्ये दलितांवर अत्याचार

ते म्हणाले,देशात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊनच्या काळात दलितांवर अत्याचार झाले. देशात जो जातीयवाद होता. तो संपविणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन यावर नियोजन केले पाहिजे. तसा प्लॅन बनवता असता तर कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असती.

ठाकरेंचं सरकार तीन पायांच

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर नेहमीची टिका केली. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच सरकार तीन पायाचं सरकार आहे. उध्दव ठाकरे आमच्या सोबत आले तर हे सरकार चार पायांचे होईल, ते सरकार पुढे चालू शकते. सिनेसृष्टीमध्ये ड्रग्स घेण्याचे प्रमाम जास्त आहे. त्यात महिला कलाकारांची संख्या जास्त आहे, ड्रग्ज प्रकरणातील कलाकारावर बहिष्कार टाकण्याची गरज आहे. अनुराग कश्यप प्रकरणावर ते म्हणाले, अनुराग कश्यपला अद्याप अटक झालेली नाही. अशा प्रकरणात दिरंगाई होता कामा नये असे मला वाटते.

राष्ट्रपती राजवट नाही

आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही असे सांगितले ते म्हणाले,कायदा व सुव्यवस्था बिघडली तरच तसे होईल, लॉकडाऊनमुळे सर्व धर्माची मंदीरे बंद आहे. मंदीरे खुली करतांना सर्व धर्मांची मंदीरे खुली करावीत. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवावा. सरकारने सर्वांच्या भावनांचा विचार करावा, तसेच मराठा समाजाला आरक्षणा देण्यात यावे, या भूमिकेचाही त्यांनी पुनरूच्चार केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*