महाराष्ट्र, बंगाल, दिल्ली, झारखंडमध्ये कोरोनाचे आकडे कमी दाखवण्यासाठी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप; थायरोकेअरच्या एमडींचा आरोप


  • महाराष्ट्र, बंगाल, झारखंड, तामिळनाडू, बिहार, दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांतील नमुने गोळा करण्याची जबाबदारी
  • चाचण्यांची संख्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे खासगी कोरोना चाचणी केंद्र थायरोकेअरने कोरोना चाचण्यांसंदर्भात (corona test) एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी होत असल्याचा आरोप थायरोकेअरचे व्यवस्थापकीय संचालक ए. वेलुमणी यांनी केला. काही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकारी आपल्या जिल्ह्याची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी करोना विषाणूची चाचणी थेट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वेलुमणी यांनी केला.

“सध्या चाचण्या सर्वांसाठी सुरू झाल्या असल्या तरी जिल्हा पातळीवर सरकार खासगी केंद्राच्या चाचण्यांवर नियंत्रण ठेवत आहे. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत हे अधिक प्रमाणात होत आहे. आम्हाला निरनिराळ्या राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये नमूने न घेण्यास सांगितलं जात आहे आणि आम्ही बनावट पॉझिटिव अहवाल सादर करत असल्याचा दावा केला जात आहे,” असे थायरोकेअर टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक वेलुमनी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.

“दररोज कमीतकमी १०० जिल्ह्यांमध्ये दोन हजार नमूने कमी केले जात आहेत. आपल्या जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या कमी आहे हे दाखवणे यामागील त्यांचा उद्देश आहे. ते आपली प्रतिमा चांगली ठेवू इच्छित आहेत. थायरोकेअरनं ज्या जिल्ह्यांमधून तपासणीसाठी नमूने घेतले आहेत त्यापैकी ३०% चाचणी केंद्रांना ही समस्या भेडसावत आहे,” असंही त्यांनी नमूद केले. दरम्यान, त्यांनी कोणत्याही जिल्ह्यांच नाव घेतले नाही. परंतु आपल्या कर्मचार्यांना चाचण्यांची संख्या मर्यादित करण्यास तोंडी सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

थायरोकेअर हे देशातील पाच मोठ्या चाचणी केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंडमधील करोनाबाधितांच्या चाचण्यांचे नमूने एकत्र करण्याचं काम थायरोकेअरद्वारे करण्यात येतं.

corona test

दरम्यान, दुसरीकडे मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शाह यांनी करोना महासाथ वाढीदरम्यान चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं. “जितक्या चाचण्या अधिक प्रमाणात होतील, तितकंच करोनाबाधितांची अधिक काळजी आपल्याला घेता येईल. याव्यतिरिक्त त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीही आपल्याला मिळेल. याद्वारे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान करोनाची दुसरी लाट येण्यास आपण रोखू शकतो,” असंही त्या म्हणाल्या.

“वेलुमणी यांनी उचललेल्या प्रश्नांचा आम्हीदेखील सामना करत आहोत. महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही भागांमध्ये असे प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक ठिकाणी असे प्रकार होताना दिसत नाहीत. परंतु काही ठराविक ठिकाणी हे होताना दिसत आहेत. अशा प्रकारांमुळे आम्हाला पूर्ण क्षमतेनं चाचण्या करता येत नाहीत.” असं एका चाचणी केंद्राच्या अधिकाऱ्यानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती