कॉंग्रेस आता पीआर कंपनी, चीनी देणग्यातून चालतोय पक्ष, सुशीलकुमार मोदी यांचा आरोप

कॉंग्रेस आता पक्ष राहिलेला नाही तर पीआर कंपनी झालेली आहे. चीनी देणग्या, मनी लॉंडरिंग ते तिकिटे विकण्याच्या कामातून पक्ष चालत आहे, अशी टीका बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केली आहे.


वृत्तसंस्था

पाटणा : कॉंग्रेस आता पक्ष राहिलेला नाही तर पीआर कंपनी झालेली आहे. चीनी देणग्या, मनी लॉंडरिंग ते तिकिटे विकण्याच्या कामातून पक्ष चालत आहे, अशी टीका बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केली आहे.

मोदी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस आता डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल आणि जगजीवन राम यांची पार्टी राहिलेली नाही. ती आता राहुल गांधी यांना पंतप्रधान व तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी काम करणारी पीआर कंपनी झाली आहे. या पीआर कंपनीचा खर्च चिनी देणग्या, मनी लाँडरिंग ते तिकीटं विकण्याच्या कामातून चालतो आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलावर मोदी यांनी टिकास्त्र सोडले आहे. लालूंच्या जंगलराजनंतर बिहारमध्ये विकासाची पहाट उगवली आहे. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल जातीय राजकारण पेटवित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर आणि ३, ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून, १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित होणार आहे. देशात कोरोना संकट असताना ही देशातील पहिली विधानसभा निवडणूक आहे. विधानसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी आहे.

कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फौंडेशनला चीनकडून तीन लाख अमेरिकन डॉलरची देणगी मिळाली होती असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना केला होता. रिपब्लिक ऑफ चायना आणि चीनी दूतावास यांनी ही देणगी दिली होती. ही देणगी का घेतली गेली? असा सवालही नड्डा यांनी केल होता. त्याचबरोबर डोकलाम संघर्षानंतर देशाच्या सोबत राहण्याऐवजी कॉंग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या राजदुतांची भेट घेतली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*